AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर

काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर

| Updated on: Jul 02, 2026 | 7:09 PM
Share

मुंबईतील अलीकडील पावसाळी दुर्घटनांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्या एका कृतीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एका चिमुकल्यासह ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी भाजपवर असंवेदनशीलतेचा आरोप केला आहे.

माहितीनुसार, विधानसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना अमित साटम यांनी, “काल झाडांवर होतं, आज मॅनहोलवर आलं,” असे म्हणत हसल्याचा दावा करण्यात आला आहे. या कथित वर्तनावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला असून, अशा गंभीर दुर्घटनांबाबत संवेदनशीलता दाखवणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये एका चिमुकल्याचा आणि साकीनाका परिसरातील उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला आहे.

दरम्यान, विरोधकांनी आरोप केला आहे की, मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या काळात मुंबईकरांच्या सुरक्षेचे आश्वासन देणारे नेते आता अशा गंभीर घटनांवर हलक्या स्वरूपाची प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या कथित प्रकारामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले असून, संबंधित वक्तव्यावर भाजपकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 02, 2026 07:09 PM

Follow Us