AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टर बनून महिलांचं शरीर… सेजल जाधवनंतर आणखी एकाचा वादग्रस्त व्हिडीओ; संतापाची लाट उसळताच…

प्रणित मोरेच्या शोमधील सेजल जाधवनंतर आता युट्यूबर बाबू गप्पीचा महिलांच्या शरीरावर आक्षेपार्ह टिप्पणी करणारा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, नेटकऱ्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

डॉक्टर बनून महिलांचं शरीर... सेजल जाधवनंतर आणखी एकाचा वादग्रस्त व्हिडीओ; संतापाची लाट उसळताच...
Babu GappiImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 03, 2026 | 12:05 AM
Share

प्रणित मोरेच्या शोमध्ये डॉ. सेजल जाधवने केलेल्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद उमटले होते. हे प्रकरण शांत होत नाही तोच आणखी एका कॉमेडियन आणि युट्यूबरचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आग्र्यातील कॉमेडियन आणि युट्यूबर बाबू गप्पी सध्या वादात अडकला आहे. बाबूचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बाबूने महिलांच्या शरीराच्या अंगावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियातून संतापाची लाट उसळली आहे. नेटकऱ्यांनी बाबूवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर बाबू गप्पीने माफईही मागितली आहे.

युट्यूबवर व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी अशा प्रकारचा कंटेट क्रिएट केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. लोकप्रियता मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारचा कंटेट करण्यात येत आहे, यावरही आता सोशल मीडियातून चर्चा सुरू झाली आहे. या वादानंतर महिलांच्या सन्मानावर देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या चर्चा करताना दिसत आहे.

व्हिडीओ येताच वाद…

यापूर्वीही महिलांवर कथित विधान केल्याप्रकरणी युट्यूबर्सवर कारवाई करण्यात आलेली आहे. आता या व्हिडीओची गंभीर दखल राज्य महिला आयोगाची अध्यक्षा बबीता चौहान यांनी घेतली आहे. आम्हाला या व्हिडीओची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात नोटीस पाठवण्यात येत आहे. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे, असं चौहान म्हणाल्या.

माफी मागितली…

डॉक्टर झाल्यावर महिलांचे शरीर पाहिल, असं वादग्रस्त विधान बाबू गप्पीने या व्हिडीओत केल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बापू गप्पीने माफी मागितली आहे. त्याचा माफी मागतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओ आणि सोशल मीडियावरील व्हिडीओ आता चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान, या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. चौकशीनंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे. मात्र, या नव्या व्हिडीओमुळे बाबू गप्पी प्रचंड अडचणीत आला आहे. आता बाबूकडून महिला आयोगाला काय उत्तर दिलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच बाबूवर या प्रकरणी फौजदारी कारवाई होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Follow Us
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप
छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल:
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार