AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल: केवळ महिला सक्षमीकरणावर गप्पा

चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल: “केवळ महिला सक्षमीकरणावर गप्पा”

| Updated on: Aug 22, 2026 | 10:15 PM
Share

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महिला सक्षमीकरणावरील भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. राहुल गांधी केवळ महिला सक्षमीकरणावर गप्पा मारत असून, जर त्यांना थोडीही लाज असेल, तर त्यांनी तात्काळ महिला आरक्षणाला पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. वाघ यांच्या मते, राहुल गांधी हे सातत्याने महिलांना ३३ टक्के […]

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महिला सक्षमीकरणावरील भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. राहुल गांधी केवळ महिला सक्षमीकरणावर गप्पा मारत असून, जर त्यांना थोडीही लाज असेल, तर त्यांनी तात्काळ महिला आरक्षणाला पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

वाघ यांच्या मते, राहुल गांधी हे सातत्याने महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आले आहेत. असे असतानाही ते महिला सक्षमीकरणावर बोलणे निव्वळ हास्यास्पद आहे. राहुल गांधींनी महिला आरक्षणाला पाठिंबा देऊन महिला सक्षमीकरणाला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. याव्यतिरिक्त, चित्रा वाघ यांनी राहुल गांधींना दुसरा प्रश्न विचारला आहे की, क्षमता असूनही प्रियांका गांधी यांच्याऐवजी राहुल गांधी यांना संधी का दिली गेली? तसेच, प्रियांकाला वयाच्या २५ व्या वर्षी लग्न करून सासरी का पाठवून दिले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Published on: Aug 22, 2026 10:15 PM

Follow Us