नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावरून भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दावा केला आहे की, या कार्यक्रमासाठी ३००० ते ३५०० लोकांना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये वाटण्यात आले. काँग्रेसने विद्यार्थ्यांना बोलावून, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यासाठी हे पैसे दिल्याचे नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत […]
पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावरून भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दावा केला आहे की, या कार्यक्रमासाठी ३००० ते ३५०० लोकांना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये वाटण्यात आले. काँग्रेसने विद्यार्थ्यांना बोलावून, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यासाठी हे पैसे दिल्याचे नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
त्यावेळी त्यांनी काही व्हिडिओ पुरावे म्हणून सादर केले. या आरोपांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनाथ बन यांनी केलेल्या दाव्यांची पडताळणी केली जाईल असे म्हटले आहे. मात्र, काँग्रेसने भाजपचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे की, भाजप राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरली असून, त्यांच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे. हे आरोप खोटे असून, फेक व्हिडिओ तयार करून लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रतिदावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
Published on: Aug 22, 2026 10:50 PM
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
'राऊतांना मोदींवर टीका करण्याचा अधिकार नाही', परिणय फुकेंचं वक्तव्य

