AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026: भारताचा सामना झिम्बाब्वे की श्रीलंकेशी! सुपर 8 फेरीपूर्वी ट्विस्ट

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. सुपर 8 फेरीतील 7 संघ ठरले असून एका संघासाठी अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात चुरस आहे. दुसरीकडे, सुपर 8 फेरीत भारताचा सामना श्रीलंका की झिम्बाब्वेशी होणार? याबाबत ट्वीस्ट आहे.

T20 World Cup 2026: भारताचा सामना झिम्बाब्वे की श्रीलंकेशी! सुपर 8 फेरीपूर्वी ट्विस्ट
T20 World Cup 2026: भारताचा सामना झिम्बाब्वे की श्रीलंकेशी! सुपर 8 फेरीपूर्वी ट्विस्ट Image Credit source: BCCI/Zimbabwe Cricket Twitter
| Updated on: Feb 17, 2026 | 8:16 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आले आहेत. तसेच सुपर 8 फेरीतील सात संघही ठरले आहे. भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका हे संघ सुपर 8 फेरीत पोहोचले आहे. तर एका संघासाठी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात चुरस आहे. पाकिस्तान नामिबिया सामन्यानंतर यापैकी एका संघाचा निकाल लागेल. पण त्या आधीच सुपर 8 फेरीतील संघांचं दोन गटात वर्गीकरण झालं आहे. सुपर 8 फेरीच्या ग्रुप 1 मध्ये झिम्बाब्वे, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारत हे संघ आहेत. तर ग्रुप 2 मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका हे संघ आहे. या गटात पाकिस्तान किंवा अमेरिकेची एन्ट्री होईल. पण या गटात एक ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. गट ब मध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचा सामना व्हायचा आहे. तसेच या सामन्यानंतर या गटात उलथापालथ होऊ शकते. मात्र असं असतानाही भारत असलेल्या गटात झिम्बाब्वेला स्थान मिळालं आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 ग्रुप 1 मध्ये अ, क आणि ड गटातील टॉप संघ आहेत. यात भारत, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे. पण ब गटात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या झिम्बाब्वेला या गटात स्थान दिलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात शेवटचा साखळी फेरीतील सामना व्हायचा आहे. हा सामना जिंकणारा संघ टॉपला राहील. त्यामुळे टॉपला असणारा संघच या गटात असायला हवा होता. मग असं काय झालं की श्रीलंका संघ टॉपला असला तरी झिम्बाब्वेच या गटात खेळणार आहे. चला जाणून घेऊयात

भारताच्या गटात झिम्बाब्वे का?

स्पर्धेपूर्वीच आयसीसीने क्रमवारीच्या आधारावर सुपर 8 फेरीतील संघांचे स्थान ठरवले होते. या संघांना सुपर 8 टप्प्यात पूर्वनिर्धारित स्थान देण्यात आले होते, त्यामुळे गटात कोणतंही स्थान मिळवलं असतं तर त्या क्रमवारीच्या आधारावरच विभागणी होणार होती. यात ग्रुप 1 मध्ये भारताला स्थान दिलं होतं. तर ग्रुप 2 मध्ये श्रीलंका असणार हे स्पष्ट होतं. त्यामुळे दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात लढणार हे आधीच स्पष्ट होतं. झिम्बाब्वेच्या जागी जर ऑस्ट्रेलिया संघ पात्र ठरला असता तर भारताच्या गटात असता. कारण एखाद्या क्रमावारीतील संघाची जागा बिगर सीडेड संघाने घेतली तर तो त्या संघाची जागा घेईल, असं ठरलं होतं.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...