Thane Crime : उल्हासनगरात गुंडांचा हैदोस, घराजवळ मित्रासोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणावर हल्ला

क्षुल्लक कारणातून तरुणांसोबत दोघा भावांनी वाद घातला. मग वाद विकोपाला गेला आणि भररस्त्यात राडा झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Thane Crime : उल्हासनगरात गुंडांचा हैदोस, घराजवळ मित्रासोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणावर हल्ला
उल्हासनगरमध्ये क्षुल्लक वादातून तरुणावर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 9:43 AM

उल्हासनगर / 2 सप्टेंबर 2023 : उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा हल्ल्याची घटनेने शहर हादरले आहे. जुन्या भांडणाच्या वादातून दोन भावांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 1 परिसरातील साधुबेला चौकात ही घटना घडली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. एक आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. किशोर उर्फ अक्षय पढारे असे जखमी तरुणाचे नाव आहे. किशोरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भीमा संसारे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, तर दुसरा आरोपी शंकर संसारे फरार आहे.

काय आहे प्रकरण?

उल्हासनगर कँम्प 1 मधील तिलकनगर परिसरात किशोर पढारे कुटुंबासोबत राहतो. बुधवारी रात्रीच्या सुमारास किशोर हा त्याचा मित्र ऋतिक सोबत घराजवळ गप्पा मारत बसला होता. यावेळी नाब्या नामक तरुण तेथे आला. त्याने ऋतिकच्या दुचाकीची चावी मागितली. मात्र ऋतिकने चावी दिली नाही. यामुळे त्यांच्यात भांडण झाले. यानंतर किशोर आणि ऋतिक दोघे उल्हासनगर पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार दाखल केली.

पोलीस ठाण्याहून घरी परतत असताना आरोपी भीमा संसारे आणि शंकर संसारे या दोघा भावांनी त्यांची दुचाकी अडवली. आमच्या विरोधात तक्रार करतो का असे विचारत दोघांनी किशोरला मारहाण करण्यास सुरवात केली. मग चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात किशोर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भीमा याला अटक केली असून, शंकर फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन बागुल हे करत आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणाऱ्या बोटीचा अपघात, बघा व्हिडीओ
शिंदेंच्या दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणाऱ्या बोटीचा अपघात, बघा व्हिडीओ.
याआधी कधी अस नव्हत...राज्यात आरक्षणाचा वाद, राज ठाकरेंनी मांडली भूमिका
याआधी कधी अस नव्हत...राज्यात आरक्षणाचा वाद, राज ठाकरेंनी मांडली भूमिका.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? शिरसाटांचं सूचक वक्तव्य काय?
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? शिरसाटांचं सूचक वक्तव्य काय?.
लोकसभेतील अपयशानंतर जानकरांचा स्वबळाचा नारा, विधानसभेसाठी तयारी सुरु
लोकसभेतील अपयशानंतर जानकरांचा स्वबळाचा नारा, विधानसभेसाठी तयारी सुरु.
पोरगं नापास झालं, आता काय करायच.. उदयनराजेंकडून निळू फुलेंची मिमिक्री
पोरगं नापास झालं, आता काय करायच.. उदयनराजेंकडून निळू फुलेंची मिमिक्री.
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी मोदींनी सांगितलं18 अंकाचं महत्त्व
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी मोदींनी सांगितलं18 अंकाचं महत्त्व.
त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, लोक रस्त्यावर मारतील; राऊतांचा पलटवार
त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, लोक रस्त्यावर मारतील; राऊतांचा पलटवार.
जरांगे पाटील आहे कोण? घटनातज्ज्ञ, वकील की पंतप्रधान? कुणाचा थेट सवाल?
जरांगे पाटील आहे कोण? घटनातज्ज्ञ, वकील की पंतप्रधान? कुणाचा थेट सवाल?.
पावसाचं सावट, चिखलाच्या मैदानात पोलीस भरती सुरू अन् विद्यार्थी आक्रमक
पावसाचं सावट, चिखलाच्या मैदानात पोलीस भरती सुरू अन् विद्यार्थी आक्रमक.
जीपला बांधलं दोर अन् भामट्यांनी ATM मशीनच पळवलं, चोरट्यांचा शोध सुरु
जीपला बांधलं दोर अन् भामट्यांनी ATM मशीनच पळवलं, चोरट्यांचा शोध सुरु.