AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SCO vs NEP : जाता जाता गेम वाजवून गेले, नेपाळकडून विजयी शेवट, स्कॉटलंडवर 7 विकेट्सने मात

Scotland vs Nepal Match Result : नेपाळ क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आपल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवला आहे.

SCO vs NEP : जाता जाता गेम वाजवून गेले, नेपाळकडून विजयी शेवट, स्कॉटलंडवर 7 विकेट्सने मात
Scotland vs Nepal Match ResultImage Credit source: Social Media
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 17, 2026 | 11:06 PM
Share

नेपाळ क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपल्या मोहिमेचा जबरदस्त असा शेवट केला आहे. नेपाळने स्कॉटलंडवर दणदणीत असा विजय साकारला आहे. नेपाळला या स्पर्धेत आपल्या साखळी फेरीतील पहिल्या 3 सामन्यांत सलग पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे चाहत्यांना विजयाची प्रतिक्षा कायम होती.  नेपाळ टीमने चाहत्यांची ही प्रतिक्षा साखळी फेरीत आपल्या शेवटच्या सामन्यात पूर्ण केली. नेपाळ यासह अपेक्षेप्रमाणे शेवटचा सामना जिंकण्यात  यशस्वी ठरली. दीपेंद्र सिह ऐरी आणि कुशल भुर्टेल या जोडीने नेपाळच्या विजयात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. या सामन्यात नक्की काय झालं? हे सविस्तर जाणनू घेऊयात.

नेपाळने वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघाला या स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात चांगलंच झुंजवलं होतं. मात्र नेपाळचा इंग्लंड विरुद्ध निसटता पराभव झाला. नेपाळला अवघ्या 4 धावांनी सामना गमवावा लागला होता. इंग्लंड या विजयामुळे मोठ्या उलटफेरपासून वाचली. मात्र इंग्लंडच्या विजयापेक्षा नेपाळच्या पराभवाची चर्चा क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळाली. अवघ्या काही धावांनी हा सामना गमावल्याने नेपाळ टीमला आणि चाहत्यांना हा पराभव जिव्हारी लागला होता. मात्र नेपाळने इंग्लंड विरुद्ध आपली कामगिरी दाखवून क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं.

नेपाळला त्यानंतर इटली आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांकडून मोठ्या फरकाने पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे नेपाळच्या चाहत्यांना टीमने साखळी फेरीतील आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने करावा अशी इच्छा होती. नेपाळ टीमने चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आणि जबरदस्त असा विजय मिळवला.  नेपाळने मुंबईतील ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियममध्ये स्कॉटलंडला पराभूत केलं. नेपाळने यासह वर्ल्ड कप स्पर्धेत 12 वर्षांची विजयाची प्रतिक्षा संपवली. नेपाळने स्कॉटलंडला पराभूत करुन 12 वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. नेपाळने याआधी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 2014 साली शेवटचा विजय मिळवला होता.

सामन्याचा झटपट आढावा

मायकल जॉन्स याने केलेल्या 71 धावांच्या जोरावर स्कॉटलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमवून 170 धावा केल्या. नेपाळने प्रत्युत्तरात 171 धावांचा पाठलाग करताना कडक सुरुवात केली. कुशल भुर्टेल आणि आसिफ शेख या सलामी जोडीने नेपाळला झंझावाती सुरुवात करुन दिली. दोघांनी आलेला प्रत्येक बॉल मारला आणि नेपाळला वेगवान सुरुवात करुन देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 55 बॉलमध्ये 74 रन्सची पार्टनरशीप केली. कुशल आऊट झाल्याने नेपाळला पहिला झटका लागला. कुशलने 43 धावा केल्या. त्यानंतर स्कॉटलंडने आसिफ शेख आणि कॅप्टन रोहित पौडेल या दोघांना ठराविक अंतराने आऊट केलं. आसिफने 33 तर रोहितने 16 धावा केल्या. त्यामुळे नेपाळची 13.2 ओव्हरमध्ये 3 आऊट 98 अशी स्थिती झाली होती.

गुलशन झा आणि दीपेंद्र सिंह ऐरीची विजयी भागीदारी

त्यानंतर गुलशन झा आणि दीपेंद्र सिंह ऐरी या जोडीने कमाल केली. गुलशन आणि दीपेंद्र या दोघांनी फक्त 36 चेंडूत नाबाद 73 धावांची भागीदारी केली. दीपेंद्रने या भागीदारीत सर्वाधिक योगदान दिलं. दींपेंद्रने स्कॉलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. दीपेंद्रने मोठे फटके मारले. त्यामुळे नेपाळच्या चाहत्यांना स्टेडियममध्ये एकच जल्लोष केला. तसेच गुलशननेही दीपेंद्रला चांगली साथ दिली. दीपेंद्र आणि गुलशन या दोघांनी फटेकबाजी करुन नेपाळला सुरक्षित असा विजय मिळवून दिला. नेपाळने 4 बॉलआधी 7 विकेट्स राखून हा सामना आपल्या नावावर केला. नेपाळने 19.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 171 रन्स केल्या. गुलशनने 24 आणि दीपेंद्रने नाबाद 50 धावा केल्या. दीपेंद्रला त्याच्या या नाबाद अर्धशतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...