AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SCO vs NEP : स्कॉटलंडकडून नेपाळला 171 धावांचं आव्हान, कोण जिंकणार शेवटचा सामना?

Scotland vs Nepal: नेपाळला या मोहिमेत आतापर्यंत विजयाची चव चाखता आलेली नाही. नेपाळ स्कॉटलंड विरुद्ध विजयाचं खातं उघडणार का? याकडे नेपाळच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

SCO vs NEP : स्कॉटलंडकडून नेपाळला 171 धावांचं आव्हान, कोण जिंकणार शेवटचा सामना?
SCO vs NEPImage Credit source: @CricketScotland X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 17, 2026 | 9:31 PM
Share

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 33 व्या सामन्यात सी ग्रुपमधील नेपाल विरुद्ध स्कॉटलंड आमनेसामने आहेत. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना आहे. स्कॉलंडने नेपाळसमोर या सामन्यात 171 धावांचं आव्हान ठेवलं आहे. स्कॉटलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 170 धावा केल्या. स्कॉटलंडच्या फलंदाजांनी त्यांनी पहिल्या 2 विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करुन टीमला 170 धावांपर्यंत पोहचवलं. आता त्यांचे गोलंदाज या धावांचा बचाव करण्यात यशस्वी ठरणार की नेपाळ पहिला विजय मिळवणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

स्कॉटलंडची बॅटिंग

स्कॉटलंडला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवण्यासाठी पहिल्या 4 फलंदाजांनी प्रमुख योगदान दिलं. स्कॉटलंडची ज्या हिशोबाने बॅटिंग सुरु होती त्यानुसार ते सहज 200 धावा करतील असं चित्र होतं. मात्र नेपाळने निर्णायक क्षणी कमबॅक केलं आणि स्कॉटलंडला झटके दिले. नेपाळने काही विकेट्स मिळवल्या आणि स्कॉटलंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यात यश मिळवलं. स्कॉटलंडसाठी मायकल जोन्स याने सर्वाधिक धावा केल्या. जोन्सने अर्धशतक केलं. जॉर्ज मुन्सी याने 27 धावा जोडल्या. तर कॅप्टन रिची बेरिंग्टन आणि मार्क वॅट या दोघांनी प्रत्येकी 10-10 धावा जोडल्या.

स्कॉटलंडची कडक सुरुवात

नेपाळने टॉस जिंकला आणि स्कॉटलंडला बॅटिंगसाठी बोलावलं. जॉर्ज मुन्सी आणि मायकल जोन्स या सलामी जोडीने स्कॉटलंडला आक्रमक सुरुवात करुन दिली. या दोघांनी 80 धावांची भागीदारी केली. मुन्सीच्या रुपात स्कॉटलंडने पहिली विकेट गमावली. मुन्सीने 29 बॉलमध्ये 4 फोरसह 27 रन्स केल्या.

मुन्सी आऊट झाल्यानंतर जॉर्जला साथ देण्यासाठी ब्रँडन मॅकमुलेन मैदानात आला. जॉर्ज आणि मॅकमुलेन या दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या जोडीने 32 चेंडूत 52 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर मायकल जोन्स याने 71 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. मॅकमुलेन याने 1 सिक्स आणि 1 फोरसह 25 रन्स केल्या. मात्र त्यानंतर नेपाळने कमबॅक केल्याने एकालाही खास करता आलं नाही. नेपाळसाठी सोमपाल कामी याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. नंदन यादव याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कॅप्टन रोहित पॉडेल आणि कौशल भुर्टेल या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...