AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही’ FD ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम, 8.10 टक्के दराने परतावा, जाणून घ्या

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या FD च्या व्याजदरात बदल केला आहे आणि नवीन दर लागू केले आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

'ही' FD ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम, 8.10 टक्के दराने परतावा, जाणून घ्या
fd schemeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 07, 2026 | 8:33 PM
Share

तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करणार असाल तर ही बातमी आधी वाचा. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या FD च्या व्याजदरात बदल केला आहे आणि नवीन दर लागू केले आहेत. हे नवे दर आजपासून म्हणजेच 6 मार्चपासून लागू झाले आहेत. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.

पैसे गुंतवण्यासाठी बँक FD लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आजही बहुतांश लोक गुंतवणुकीसाठी केवळ बँक FD वर अवलंबून असतात. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांमध्ये बँक FD अधिक लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनाही सामान्य नागरिकांपेक्षा FD मध्ये जास्त व्याज मिळते.

तुम्हीही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचे पैसे गुंतवण्यासाठी बँक FD ची मदत घेत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा FD बद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता आणि 8 टक्के जास्त व्याजदराने परतावा मिळवू शकता.

आम्ही सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या FD बद्दल बोलत आहोत. आता सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या FD च्या व्याजदरात बदल केला आहे आणि नवीन दर लागू केले आहेत. हे नवे दर आजपासून म्हणजेच 6 मार्चपासून लागू झाले आहेत. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.

FD चे व्याजदर 1 वर्ष – 7.45 टक्के 2 वर्ष – 7.45 टक्के 3 वर्षे – 7.45 टक्के 4 वर्ष – 6.95 टक्के 5 वर्ष – 8.10 टक्के 10 वर्षे – 7.45 टक्के

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक FD मधील परतावा

तुम्ही सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या 5 वर्षांच्या FD मध्ये 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 7.46 लाख रुपये मिळतील. या प्रकरणात तुम्हाला एकूण 2.46 लाख रुपयांचा नफा होईल. तर सर्वसामान्य नागरिकांना येथे 2 लाख 39 हजार रुपयांचा फायदा होणार आहे.

तुम्हाला 2 वर्षांच्या मुदतीसह FD मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही बंधन बँक आणि आरबीएल बँकेच्या FD मध्येही गुंतवणूक करू शकता. येथे तुम्हाला 7.7 टक्के व्याजदराने परतावा मिळेल. याशिवाय तुम्ही आयडीएफसी बँक, येस बँक आणि इंडसइंड बँकेतही गुंतवणूक करू शकता. येथे तुम्हाला 7.5 आणि 7.4 टक्के व्याजदराने परतावा मिळेल.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले