AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parbhani ZP Election Result 2026 : भाजपच्या बड्या नेत्यावर मोठी नामुष्की, जिल्हा परिषदेत कुटुंबातील 5 पैकी 4 जण हरले

Parbhani ZP Election Result 2026 : परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या बड्या नेत्याला मोठा धक्का बसला आहे. एकाच कुटुंबातील पाचपैकी चार उमेदवार पराभूत झाल्याने त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली आहे.

Parbhani ZP Election Result 2026 : भाजपच्या बड्या नेत्यावर मोठी नामुष्की, जिल्हा परिषदेत कुटुंबातील 5 पैकी 4 जण हरले
सुरेश वरपूडकरImage Credit source: Tv9
| Updated on: Feb 09, 2026 | 1:38 PM
Share

Parbhani ZP Election Result 2026 : परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची आणि माजी मंत्र्यांची घराणेशाहीला नाकारलं आहे. परभणीच्या लोहगाव जिल्हा परिषद सर्कलमधून भाजप नेते सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबातील 5 पैकी 4 जणांचा पराभव झाला आहे. तर फक्त पुतण्या अजित वरपूडकर याने कुटुंबाची लाज राखत विजय मिळवला आहे. अजितला काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. वरपूडकर कुटुंबातील या एकमेव सदस्याचा विजय झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सुरेश वरपूडकर यांनी त्यांच्यात कुटुंबातील एक-दोन नव्हे तर पाच जणांना वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी दिली होती. मुलगा समशेर वरपूडकरला शिंगणापूर गटातून, सून प्रेरणाला दैठणा गटातून, मुलगी सोनल देशमुख ही शिवसेना ठाकरे गटातून आणि पुतणे ऐश्वर्या हे जांब गटातून निवडणुकीला उभे होते. दुसरा पुतण्या अजित वरपूडकर यांनी काँग्रेसकडून लोहगाव गटातून निवडणूक लढवली होती. कुटुंबातून फक्त त्यांचाच विजय झाला आहे. इतर सर्वांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे.

वरपूडकरांनी कुटुंबातीलच पाच सदस्यांना उमेदवारी दिल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत त्याची चांगलीच चर्चा होती. परंतु परभणीकरांनी या घराणेशाहीला साफ नकार दिल्याचं आता मतमोजणीत स्पष्ट झालं आहे. सत्तेच्या सर्व चाव्या आपल्याकडेच ठेवण्याचा हा प्रयत्न मतदारांनी हाणून पाडला आहे.

एकाच कुटुंबातील 5 पैकी 4 जणांचा पराभव

  1. समशेर वरपूडकर (मुलगा)- शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून समशेर वरपूडकर यांचा ठाकरे गटाच्या पांडुरंग खिल्लारे यांनी पराभव केला.
  2. सोनल देशमुख (मुलगी)- झरी सर्कल इथून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या सोनल देशमुख यांचा भाजपचे दिलीप देशमुख यांनी पराभव केला.
  3. प्रेरणा वरपूडकर (सून)- दैठणा गटातून प्रेरणा वरपूडकर यांचा काँग्रेसच्या ज्योत्सना घाडगे यांनी पराभव केला.
  4. बोणी वरपूडकर (पुतण्या)- बोणी वरपूडकर यांचा दुसरा पुतण्या अजित वरपूडकर यांनीच पराभव केला. लोहगाव गटात पुतण्या विरुद्ध पुतण्या अशी चुरस होती.

भाजपचे नेते सुरेश वरपूडकर यांचे पुतणे अजित अनिल वरपूडकर लोहगाव सर्कलमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढत होते. त्यांचा विजय झाला असून वरपूडकर घराण्यातील अजित वरपूडकर हे एकमेव विजयी उमेदवार ठरले आहेत. “मला पाडण्यासाठीच भाजपने माझ्या विरोधात माझा चुलत भाऊ उभा केला होता,” असा गंभीर आरोप अजित वरपूडकर यांनी सुरेश वरपूडकर यांच्यावर केला आहे. माझ्या विजयाचं सगळं श्रेय मी माझ्या मित्रांना देतो, अशी पहिली प्रतिक्रिया काँग्रेसचे नवनिर्वाचे जिल्हा परिषद सदस्य अजित वरपूडकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?