AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zilla Parishad Election Result 2026 : एका मताने पलटली बाजी; भाजप उमेदवाराला मोठा धक्का!

Zilla Parishad Election Result 2026 : धाराशिवमधल्या ढोकी पंचायत समिती गणात भाजपला मोठा धक्का बसला आहे. अवघ्या एका मताने इथली बाजी पलटली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने एका मताने भाजपच्या उमेदवाराचा पराभाव केला आहे.

Zilla Parishad Election Result 2026 : एका मताने पलटली बाजी; भाजप उमेदवाराला मोठा धक्का!
BJPImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 09, 2026 | 12:17 PM
Share

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. धाराशिवमधल्या ढोकी पंचायत समिती गणातून शिवसेना ठाकरे गटाचे अमर समुद्रे विजयी झाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे अमर समुद्रे हे फक्त एका मतानं विजयी झाले आहेत. अमर समुद्रे यांना 3187 मतं मिळाली असून त्यांनी एका मताने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. भाजपचे निहाल काझी यांनी 3186 मतं मिळाली आहेत. अवघ्या एका मताने त्यांचा पराभव झाला आहे. ढोकी गणात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पहायला मिळत होती. मजमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांनी श्वास रोखून धरला होता. अखेर अमर समुद्रे यांनी निसटता पण ऐतिहासिक असा विजय पटकावला आहे. भाजपच्या उमेदवाराचं त्यांनी फक्त एका मताने पराभव केला आहे. फक्त एका मताने पराभव झाल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली होती. आधी टपाली मतदानांची मोजणी झाली. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधून मतमोजणी करण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासात हा निकाल पूर्णपणे फिरला आणि अखेर शिवसेना ठाकरे गटाने आपला विजय नोंदवला, तर भाजप उमेदवाराच्या हाती निराशा आली.

धाराशिवमधल्या भाई उद्धवराव शासकीय आयटीआयमध्ये मतमोजणी झाली. जिल्हा परिषदेचे 55 सदस्य आणि पंचायत समितीच्या 110 सदस्यांसाठी ही मतमोजणी पार पडली. 15 टेबलांवर ही मजमोजणी झाली आणि त्यासाठी 150 शासकीय अधिकारी काम करत होते. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी 25 हजार मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. या निवडणुकीसाठी 7 हजार 438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांच्या मुख्य निवडणूक केंद्रात सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी केंद्राबाहेर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Follow Us
NEET परीक्षा रद्द होताच विद्यार्थ्यांचा संताप अनावर; रस्त्यावर उतरून..
NEET परीक्षा रद्द होताच विद्यार्थ्यांचा संताप अनावर; रस्त्यावर उतरून...
विद्यार्थ्यांना मोठा झटका.... अचानक नीट परीक्षा रद्द; सीबीआयची एन्ट्री
विद्यार्थ्यांना मोठा झटका.... अचानक नीट परीक्षा रद्द; सीबीआयची एन्ट्री.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात, ईडीचं समन्स? चौकशी
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात, ईडीचं समन्स? चौकशी.
महाराष्ट्र पोलिसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमकी घोषणा काय?
महाराष्ट्र पोलिसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमकी घोषणा काय?.
मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये; विभागीय बैठका ऑनलाइन
मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये; विभागीय बैठका ऑनलाइन.
सुवेंदू अधिकारी यांचा मास्टरस्ट्रोक? निवडणूक अधिकाऱ्याचीच या पदावर...
सुवेंदू अधिकारी यांचा मास्टरस्ट्रोक? निवडणूक अधिकाऱ्याचीच या पदावर....
आई तुळजाभवानीच्या चरणी रेकॉर्डब्रेक सोनं; आकडा ऐकूनच व्हाल थक्क....
आई तुळजाभवानीच्या चरणी रेकॉर्डब्रेक सोनं; आकडा ऐकूनच व्हाल थक्क.....
पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! भाजप सत्तेत येताच मोठी कारवाई; गंभीर..
पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! भाजप सत्तेत येताच मोठी कारवाई; गंभीर...
आमच्याकडून चूक झाली, यापुढे मी किंवा माझे सहकारी... राज ठाकरे यांचं...
आमच्याकडून चूक झाली, यापुढे मी किंवा माझे सहकारी... राज ठाकरे यांचं....
बेवड्यांचं काही खरं नाही...थलपती विजयची तळीरामांवर वाकडी नजर.....
बेवड्यांचं काही खरं नाही...थलपती विजयची तळीरामांवर वाकडी नजर......