AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी घरातून निघाला तो परत आलाच नाही… लोकलमधून पडून एकाचा मृत्यू; मुंब्रा खाडी परिसरात घडला धक्कादायक प्रकार

लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे, पण हिच लाईफलाईन आता मृत्यूचा मुख्य कारण होत आहे. आता देखील एका 27 वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृ्त्यू झाला आहे. सध्या पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

सकाळी घरातून निघाला तो परत आलाच नाही... लोकलमधून पडून एकाचा मृत्यू; मुंब्रा खाडी परिसरात घडला धक्कादायक प्रकार
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Aug 11, 2026 | 11:43 AM
Share

मायानगरीत टिकून राहण्यासाठी मुंबईची लोकल सर्व मुंबईकरांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते. रोज सकाळी असंख्या चाकरमानी लोकल पकड्यासाठी धावत असतात. कारण प्रत्येकाचा विश्वास आहे की, लोकल त्यांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचवेल. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की, कधी काय होईल सांगता येत नाही, कारण लोकलमध्ये होणारी गर्दी दिवसागणिक वाढत आहे. अशात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. आता देखील अशीच मोठी घटना घडली आहे. मुंब्रा खाडी परिसरात धक्कादायक प्रकार घडला. लोकलमधून प्रवास करत असताना तरुणाने अखेरचा श्वास घेतला. तरुण सकाळी आनंदाने घरातून निघाला खरा, पण पुन्हा परतलाच नाही.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, मुंब्रा खाडी रेल्वे पुलाजवळ धावत्या लोकलमधून पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. साईराज बेणारे असं मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव असून तो फक्त 27 वर्षांचा होता. साईराज याच्या निधनाने पुन्हा ठाणे-डोंबिवली दरम्यानच्या रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर येत आहे. तर साईराज याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान, रेल्वे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल घटनास्थळी दाखल झाले. समोर येत असलेल्या माहितीनुसार, लोकलमधून खाली पडल्यानंतर तरुणाचा मृतदेह मुंब्राखाडी मधील एका लोखंडी रॉडमध्ये अडकलेला. तेव्हा तरुणाचा जागीत मृत्यू झाला. साईराज बेणारे याचा मृतदेह आता पुढील तपासासाठी पोलिसांना ताब्यात घेतला आहे.

साईराज बेणारे याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी छत्रपती महाराज रुग्णालय कळवा येथे आहे. सांगायचं झालं तर, ही पहिलीच घटना नाही, याआधी देखील लोकलने प्रवास  करताना प्रवाशांचे प्राण गेले आहेत. यावर निर्णय घेण्यासाठी देखील प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. सकाळी कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने लोकलेने प्रवास करतात.

अनेक प्रवासी लोकलच्या दरवाज्याला लटकून प्रवास करतात, ज्यामुळे देखील अनेकांचे प्राण गेले आहेत आणि ही संख्या दिवसागणिक वाढत आहे. जी चिंतेची  बाब आहे. त्यामुळे प्रवास करताना स्वतःची काळजी घ्या… असं आवाहन वारंवार करण्यात येतं.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!