AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याला काय XXXX कळतं का? चूक मान्य करावी, अन्यथा…; मनोज जरांगेंची सरकारला वार्निंग

मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

त्याला काय XXXX कळतं का? चूक मान्य करावी, अन्यथा...; मनोज जरांगेंची सरकारला वार्निंग
| Updated on: Aug 11, 2026 | 11:44 AM
Share

महाराष्ट्रात कुणबी नोंदीवरून राजकारण तापलं आहे. या नोंदीवरून मनोज जरांगे आणि महाराष्ट्र सरकार आमनेसामने आले आहेत. बीडच्या रेखा अंबुरे यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा वादात प्रशासनाने उडी मारली आहे. बीड जिल्हा प्रशासनाने कोणतेही कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही, असं सांगण्यात आलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केवळ तक्रार अर्जावर चौकशीचे निर्देश दिले होते. तसेच प्रमाणपत्र रद्द करण्याचेही आदेश दिले नव्हते, असेही प्रशासनाने म्हटलं आहे. बीड प्रशासनाच्या या स्पष्टीकरणावरून मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला आहे.

मनोज जरांगे यांनी बीड प्रशासनावर कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यावरून संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे म्हणाले, ‘त्याला काय #XXX$ कळतं  का? पेपर फोडून अधिकारी झाला आहे का? कालपासून स्तुती करतोय. तुला अक्कलच येईना. त्यांचा एक दर्जा असतो. तुम्ही बुद्धी वापर करून शिकलेला असता. कोणत्याही मंत्र्‍याच्या उपकाराने मंत्री झालेला नसता. खरं ते करावं. मराठ्यांच्या भानगडीत पडू नये. प्रवक्ते किंवा वकिली करू नयेत. तुमच्या पोस्ट बघाव्यात. पत्र दिलं नाही. त्यात पत्राच्या आधारे कुणबी पत्र रद्द झालं. कोणत्या मंत्र्‍याने सांगितलं. बावनकुळे यांनी फोन करून सांगितलं असेल. फडणवीस साहेब खोलात जाऊ नये. मराठ्यांच्याविषयी खोलात जाऊ नये. जड जाईल. आता चूक मान्य करून दुरुस्ती करावी. आम्ही केलेल्या चुका सुधारणार आहोत. आम्हाला काय देणंघेणं आहे’.

मराठा समाजातील तरुणांच्या नोकरीच्या प्रश्नावरही जरांगे यांनी भाष्य केलं. जरांगे म्हणाले, ‘मराठ्यांना फक्त प्रचारासाठी ठेवायचं आहे. त्यांना फक्त पत्रके चिकटवण्यास ठेवायचं आहे. सभेसाठी माणसं आणायला. मराठ्यांना मोठं होऊ द्यायचं नाही. पैसेवाले होऊ द्यायचं नाही. ऊर्जा खाते यांच्याकडे नाही. प्रताप सरनाईक यांनी एसटी महांमडळात काही नोकऱ्या दिल्या. परंतु एमआयडीसमध्ये दिल्या नाहीत. कधी जागा देतात, माहीत नाही. मराठा समाजाच्या तरुणांना नोकऱ्या दिल्या पाहिजे. तुमचा माज उतरावयचा आहे. चूक सुधारली तर सोडणार नाही,असा इशारा त्यांनी दिला’.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात