Abhijeet Dipke: ‘बोगस डिग्री घेऊन इतक्या मोठ्या पदावर…’, अभिजीत दिपके आता कुणावर संतापले?
Abhijeet Dipke Statements: कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यांचा पक्ष सध्या आंदोलनापासून थोडा दूर आहे. पण समाज माध्यमातून ते अनेक मुद्दे उचलतात. त्यावर भाष्य करतात. त्यांचे मत मांडतात.

Abhijeet Dipke Statements: कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके हे समाज माध्यमांवर सक्रिय असतात. सध्या त्यांचा पक्ष एक महिन्यापासून मोठ्या आंदोलनापासून दूर आहे. पण अनेक महत्त्वाच्या विषयावर ते समाज माध्यमातून व्यक्त होत आहे. चिंता व्यक्त करत आहेत. तर यावेळी अभिजीत दिपके यांनी देशातील नाही तर परदेशातील एका मुद्यावर संताप व्यक्त केला. त्यांनी आग्नेय आशियातील इंडोनेशिया या देशातील घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या देशाचे उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यावरून त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. बनावट आणि बोगस शैक्षणिक अर्हता, प्रमाणपत्र मिळवत कोणी इतक्या मोठ्या पदावर कसे पोहचू शकते असा तिखट सवाल त्यांनी केला. इंडोनेशियाचे उपराष्ट्रपती जिबरान राकाबुमिंग हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. बोगस शैक्षणिक प्रमाणपत्राचे प्रकरण समोर येताच त्यांनी राजीनामा दिला. यासंबंधीचे एक वृत्त दिपके यांनी शेअर करत चिंता व्यक्त केली.
हा तर अत्यंत निलाजरेपणा
बीबीसीच्या एका वृत्ताचा दाखल देत इंडोनेशियातील घडामोडींवर दिपके यांनी प्रतिक्रिया दिली. बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रांचा वापर करून देशातील एका उच्च घटनात्मक पदावर जाणे, हे कोडगेपणा आणि निलाजरेपणाचा कळस असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली.
का दिला राजीनामा?
काही वृत्तानुसार, जिबरान यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. इंडोनेशियाच्या सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोहचले होते. जिबरान यांनी वर्ष 2024 मधील निवडणुकीत माध्यमिक शाळेतील खोटे शैक्षणिक प्रमाणपत्र जोडल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात 100 हून अधिक खासदारांनी मोर्चा उघडला होता. या पेचातून बाहेर पडण्यासाठी अखेर त्यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा प्रबोवो सुबियांतो यांच्याकडे सादर केला. त्यांचा राजीनामा सुबियांतो यांनी स्वीकारला का नाही हे अद्याप समोर आले नाही.
केरळमधील मोर्चाची चर्चा
सीजेपीने 7 नोव्हेंबर रोजी SIR आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात केरळमध्ये मोर्चा काढला होता. त्यात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या मोर्चादरम्यान तिरंगा फडकवल्याने आपल्यासह साथीदारांना तुरुंगावास झाल्याचा आरोप त्यांनी केला. तिरंगा फडकवला म्हणून यापूर्वी इंग्रजांच्या काळात तुरूंगात टाकण्यात येत होते, असा टोलाही दिपके यांनी त्यावेळी लगावला.
