RBI News on 2000 Note : आरबीआयने हादरवलं ना, नोटबंदीने अर्थव्यवस्थेला मोठा धोका? अर्थ सचिवांनी तर स्पष्टच सांगितले..

| Updated on: May 20, 2023 | 10:35 AM

RBI News on 2000 Note : आरबीआयने 2000 रुपयांची नोट बंद करुन सर्वांनाच हादरा दिला. पण अनेक अर्थतज्ज्ञांनी यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा धोका असल्याचा दावा केला. तर अर्थ सचिवांनी तर स्पष्टच सांगितले...

RBI News on 2000 Note : आरबीआयने हादरवलं ना, नोटबंदीने अर्थव्यवस्थेला मोठा धोका? अर्थ सचिवांनी तर स्पष्टच सांगितले..
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) शुक्रवारी बॉम्ब टाकला. 2000 रुपयांची नोट (2000 Rupees Note) गेल्या वर्षभरापासून दिसत नसल्याची ओरड होत होती. तिचे एकदाचे उत्तर आरबीआयने काल देऊन टाकले. ही नोटच चलनातून बाहेर केली. अर्थात अजून येत्या 30 सप्टेंबरपर्यंत ही नोट बाजारात वैध राहणार आहे. खरंतर 2000 रुपयांच्या नकली नोटा ही केंद्र सरकारची खरी डोकेदुखी होती. गाजावाजा करुन आणलेली ही नोट फसली. त्याचा परिणाम कालच्या निर्णयातून दिसला. पण अनेक अर्थतज्ज्ञांनी यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा धोका असल्याचा दावा केला. तर अर्थ सचिवांनी तर स्पष्टच सांगितले.

नोट का करण्यात आली बाहेर
देशाचे अर्थसचिव टीव्ही सोमनाथन यांनी 2000 रुपयांची नोट चलना बाहेर करण्याचे कारण दिले. अर्थात हे कारण न पटण्यासारखे आहे. डिजिटल व्यवहारांमुळे नगदी नोटांचे मार्केट कमी झाले. त्यामुळे 2000 रुपयांची नोट माघारी बोलविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ही नोट 2016 मध्ये बाजारात आणण्यात आली. पण बाजारात या नोटेचा वापर कमी झाला. डिजिटल व्यवहार वाढल्याने नोट वापरत नव्हती. आता इतक्या अधिक मुल्याच्या नोटेची आवश्यकता नसल्याचा दावा त्यांनी केला.

बँकेत एकावेळी इतके रुपये जमा करता येतील
बँकेत एकावेळी तुम्ही 2000 रुपयांच्या 20 हजार रुपयापर्यंतची रोख रक्कम जमा करु शकता. बँक या नोटांच्या बदल्यात तुम्हाला दुसरे चलन देईल. 23 मे 2023 पासून बँकामध्ये जाऊन तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटा बदलता येईल.

हे सुद्धा वाचा

अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम?
2000 रुपयांची नोट चलनातून बाहेर गेल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असा दावा अनेक अर्थतज्ज्ञांनी केला आहे. त्यावर केंद्रीय अर्थ सचिव टीव्ही सोमनाथन यांनी पण प्रतिक्रिया नोंदवली. या नोटबंदीचा कोणताचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. बिझनेस स्टँडर्डच्या एका अहवालात या नोटेचा बाजारातील, व्यवहारातील उपयोग, वापर कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

ज्येष्ठ, दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था
नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना अडचण येऊ शकते. आरबीआयने परिपत्रक काढून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी खास व्यवस्था करण्याचे बँकांना निर्देश दिले आहेत.

कधी आली पहिल्यांदा नोट
नोटबंदीनंतर 2017 मध्ये आरबीआयने 2000 रुपयांची नोट चलनात आणली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नोट मुद्रण प्राधिकरण लिमिटेडने 2000 रुपयांच्या नोटेची छपाई नोटबंदी होण्याच्या 2.5-3 महिन्यापूर्वीच सुरु केली होती. त्यावेळी 500 रुपयांची नोट छापण्यात आली नव्हती.