31 मार्चपूर्वी हे काम करा, अन्यथा तुमचं पॅन कार्ड रद्द होणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : नोकरी असो किंवा कुठला व्यवसाय पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आयकर फाईल करण्यापासून ते बँकेत खातं उघडण्यापर्यंत सर्वच कामांसाठी पॅन कार्डची गरज असते. इतंक महत्त्वाचं असणारं हे पॅन कार्ड जर कुठल्या कामाचचं राहिलं नाही तर काय होईल. कारण येत्या 31 मार्च 2019 पासून तुमचं हे पॅन कार्ड रद्दी होणार आहे. जर तुम्ही […]

31 मार्चपूर्वी हे काम करा, अन्यथा तुमचं पॅन कार्ड रद्द होणार
पॅन कार्डमध्ये फोटो बदलण्यासाठी अशी आहे पद्धत – सगळ्यात आधी एनएसडीएलच्या (NSDL) अधिकृत वेबसाईटवर जा. यानंतर Application Type पर्यायावर क्लिक करा Changes or correction in existing PAN Data ऑप्शन सिलेक्ट करा.
Follow us on

मुंबई : नोकरी असो किंवा कुठला व्यवसाय पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आयकर फाईल करण्यापासून ते बँकेत खातं उघडण्यापर्यंत सर्वच कामांसाठी पॅन कार्डची गरज असते. इतंक महत्त्वाचं असणारं हे पॅन कार्ड जर कुठल्या कामाचचं राहिलं नाही तर काय होईल. कारण येत्या 31 मार्च 2019 पासून तुमचं हे पॅन कार्ड रद्दी होणार आहे. जर तुम्ही 31 मार्चपूर्वी तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड रद्द होऊ शकतं. याअंतर्गत तब्बल 19 केटी पॅन कार्ड हे निश्क्रिय होऊ शकतात.

31 मार्चपूर्वी आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही अद्यारही हे काम केलेलं नसेल तर भविष्यात तुम्हाला अडचण येऊ शकते. गेल्या वर्षी सरकारने असे 11.44 लाख पॅन कार्ड रद्द केले होते. 31 मार्चपर्यंत जर पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड रद्द होऊ शकतं.

आयकर कलम 139एए अंतर्गत जर आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर ते पॅन कार्ड अवैध मानले जाईल. पॅन कार्ड लिंक नसल्याने तुम्ही ऑनलाईन आयकर परतावा दाखल करु शकणार नाही. कर रिफंडमध्ये अडचण येऊ शकते.

गेल्या वर्षी सरकारने करदात्यांना आयकर परतावा भरण्यासाठी आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करण्यास सांगितले होते. त्यंनंतर याची अंतिम मुदत वाढवण्यात आली. मार्च 2018 पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यास सांगण्यात आलं. मात्र, सर्वोच्च न्यायालयात आधार कार्ड संबंधित खटल्यामुळे याची 31 ऑगस्ट 2018 ठेवण्यात आली. त्यानंतर अंतिम तारखेत वाढ करत आता 31 मार्च 2019 पर्यंत आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य असल्याचं सांगण्यात आलं आहे.