
ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणारी सर्वात मोठी कंपनी 2012 मध्ये आली. तीन मित्रांनी मिळून फूडपांडा ही कंपनी सुरू केली होती. हळूहळू कंपनीचा व्यवसाय 45 देशांमध्ये विस्तारत गेला. दररोज 2 लाखाहून अधिक ऑर्डर येऊ लागल्या. काही वेळातच ही कंपनी 3 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली. पण त्यानंतर कंपनीची स्थिती बिघडली. त्यामुळे ओलाने 2017 मध्ये ही कंपनी केवळ 250 कोटी रुपयांना विकत घेतली. त्यानंतर ओलाने यात सुमारे 500 कोटींची गुंतवणूक केली, पण नंतर 2019 मध्ये ही कंपनी बंद करावी लागली. आता बाजारात झोमॅटो आणि स्विगी या सर्वात मोठ्या फूड डिलिव्हरी कंपन्या आहेत. आजपर्यंत या क्षेत्रात अनेक कंपन्यांनी आपलं नशीब आजमावलं. पण त्यांना फारसा नफा मिळवता आला नाही. पण दीपंदर गोयल यांच्या झोमॅटोने मात्र यातून चांगला नफा कमवला. त्यांची कंपनी कशी करते कमाई जाणून घेऊयात. Zomato चे बिझनेस मॉडेल काय आहे? अनेक कंपन्या कदाचित एकाच माध्यमातून पैसे कमवण्याच्या...