AIBE 16 Registration : अखिल भारतीय बार परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवली

| Updated on: Apr 30, 2021 | 6:09 PM

बार काउंसिल ऑफ इंडिया आता ऑल इंडिया बार एग्जामिनेशन (एआईबीई) परीक्षेची नवीन तारीख जाहीर करेल. याआधी 25 एप्रिल रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती, मात्र कोविड-19 मुळे परीक्षा स्थगित करण्यात आली. (Extended last date of registration for All India Bar Exam, apply on allindiabarexamination.com)

AIBE 16 Registration : अखिल भारतीय बार परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवली
अखिल भारतीय बार परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवली
Follow us on

AIBE 16 Registration Date Extended नवी दिल्ली : बार काउंसिल ऑफ इंडिया (Bar Council Of India) ने ऑल इंडिया बार एग्जामिनेशन (All India Bar Examination) XVI च्या नोंदणीची तारीख अजून वाढवली आहे. बार काउंसिल ऑफ इंडिया (BCI)ने यासंबंधी एक नोटिस जारी केली आहे. AIBE-16 परीक्षेसाठी रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 15 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. परीक्षेची नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे या नोटिशीत म्हटले आहे. (Extended last date of registration for All India Bar Exam, apply on allindiabarexamination.com)

ऑल इंडिया बार एग्जामिनेशन (AIBE)साठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट allindiabarexamination.com वर जाऊन अर्ज करु शकतात. बार काउंसिल ऑफ इंडिया आता ऑल इंडिया बार एग्जामिनेशन (एआईबीई) परीक्षेची नवीन तारीख जाहीर करेल. याआधी 25 एप्रिल रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती, मात्र कोविड-19 मुळे परीक्षा स्थगित करण्यात आली. त्यानंतर परीक्षा 30 मे रोजी शेड्युल करण्यात आली, मात्र आता पुन्हा परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

असा करा अर्ज

– या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम ऑल इंडिया बार परीक्षेच्या अधिकृत वेबसाईट allindiabarexamination.com वर जा.
– येथे होम पेज वर Registration (AIBE-XVI) च्या लिंक वर क्लिक करा.
– या लिंकवर क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले .
– येथे मोबाईल नंबर आणि ईमेल आईडीच्या मदतीने रजिस्ट्रेशन करु शकता.
– रजिस्ट्रेशन केल्यावर ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्म (AIBE Application Form) भरु शकता.

काय आहे AIBE Exam?

एआयबीई लॉ ग्रेजुएट्ससाठी एक राष्ट्रीय स्तरीय सर्टिफिकेशन एग्जाम आहे. प्रॅक्टिस करण्याचे सर्टिफिकेट मिळविण्यासाठी ही परीक्षा दिली जाते. यामुळे लॉ ग्रेजुएट्सना लॉ प्रॅक्टिसची परवानगी मिळते. लॉ फायनल ईअरचे विद्यार्थीही ही परीक्षा देऊ शकतात. याआधी ऑल इंडिया बार एग्जामिनेशन XV (AIBE-XV)चे आयोजन 24 जानेवारी, 2021 रोजी करण्यात आले होते. यामध्ये जवळपास 1,20,000 अॅडव्होकेट सहभागी झाले होते. (Extended last date of registration for All India Bar Exam, apply on allindiabarexamination.com)

इतर बातम्या

Gold Rate Today: सोने-चांदी 1000 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे दर

गेल्या 65 वर्षांच्या इतिहासात एलआयसीला सर्वाधिक नफा, जाणून घ्या पॉलिसी धारकांना काय होईल फायदा?