बारावी पास आहात? मग मोठी संधी, रेल्वे विभागात बंपर भरती सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी

| Updated on: Apr 06, 2024 | 2:38 PM

Indian Railway Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावीत, ही मोठी संधी आहे.

बारावी पास आहात? मग मोठी संधी, रेल्वे विभागात बंपर भरती सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी
Railway
Follow us on

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता नो टेन्शन. फक्त सरकारी नोकरीच नाही तर थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, खरोखरची ही मोठी संधी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. चला तर मग लगेचच इच्छुकांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

ही भरती प्रक्रिया दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून ट्रेड अप्रेंटिससाठी घेतली जातंय. ही एकप्रकारची मेगा किंवा बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. secr.indianrailways.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला अर्ज करावे लागतील.

secr.indianrailways.gov.in याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. चला तर मग लगेचच करा अर्ज. 24 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया तब्बल 1113 पदांसाठी होत आहे. इच्छुकांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेतून या भरती प्रक्रियेतून टर्नर, स्टेनोग्राफर, वेल्डर, मेकेनिकल रेफ्रीजरेटर, मेकेनिकल डिजिल, प्रोग्रामर असिस्टेंट, कंप्यूटर ऑपरेटर, प्रोग्रामर असिस्टेंट अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क हे भरावे लागणार नाहीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास असायला हवा. तसेच उमेदवाराकडे आयटीआय पासचे प्रमाणपत्र असणेही आवश्यक आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 1 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.