नेव्हल डॉकयार्डमध्ये मेगा भरती, विविध पदांसाठी भरती सुरू, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, तब्बल इतक्या जागांसाठी..

| Updated on: Apr 27, 2024 | 12:45 PM

Naval Dockyard Bharti 2024 : नेव्हल डॉकयार्डमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मग उशीर न करता उमेदवारांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच आहे.

नेव्हल डॉकयार्डमध्ये मेगा भरती, विविध पदांसाठी भरती सुरू, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, तब्बल इतक्या जागांसाठी..
Naval Dockyard
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. मग उशीर कशाला करता लगेचच करा अर्ज. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 19 एप्रिल 2024 पासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या (नेव्ही) अंतर्गत असलेल्या मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड स्कूलसाठी ही भरती सुरू असून अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि या भरतीबद्दल जाणून घ्या सविस्तर.

नेव्हल डॉकयार्डमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आठवी पास ते दहावी पास असलेले उमेदवार हे अर्ज करू शकतात. यासोबतच उमेदवार हा आयटीआय पास असणेही आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. 19 एप्रिलपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. 301 पदांसाठी ही भरती सुरू आहे. यामधून इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रॉप लेटर, शीट मेटल वर्कर, टेलर, जहाजचालक, मेकॅनिक आरईएफ, पाईप फिटर अशी विविध पदे ही भरली जातील.

https://registration.ind.in/ येथे जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकता. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवारांनी सर्वात अगोदर या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज ही करावीत. अजिबात घाई न करता अगोदर अधिसूचना व्यवस्थित वाचा.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी असून आठवी पास ते दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 मे 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.