ना परीक्षेचे टेन्शन, ना मुलाखतीचे, थेट पद्धतीने होणार उमेदवाराची निवड, रेल्वे विभागात बंपर भरती सुरू, दहावी पास असणाऱ्यांसाठी संधी

| Updated on: Apr 07, 2024 | 11:41 AM

Railway Recruitment 2024 : रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची एक मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे.

ना परीक्षेचे टेन्शन, ना मुलाखतीचे, थेट पद्धतीने होणार उमेदवाराची निवड, रेल्वे विभागात बंपर भरती सुरू, दहावी पास असणाऱ्यांसाठी संधी
Railway
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. बंपर भरती प्रक्रिया सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी आता अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास देखील आरामात अर्ज करू शकतात. ही एकप्रकारची बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाकडून राबवली जातंय. शिकाऊ उमेदवारांच्या विविध जागा या भरती प्रक्रियेतून भरल्या जाणार आहेत. चला तर मग लगेचच करा अर्ज.

ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाकडून विविध पदांसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. secr.indianrailway.gov.in या साईटला जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. याच साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलच सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. चला तर मग लगेचच करा अर्ज.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 733 पदे ही भरली जाणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. दहावी पास आणि आयटीआय पास असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. आयटीआय पासचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 24 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत उमेदवारांना देण्याचे टेन्शन नाहीये. थेट पद्धतीनेच उमेदवाराची निवड केली जाणार आहे. परीक्षेचे नो टेन्शन उमेदवारांना असणार आहे.

आयटीआयच्या गुणवत्तेनुसार यादी रेल्वे विभागाकडून प्रसिद्ध केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत.