1 हजार 499 पदांसाठी भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज

| Updated on: Mar 25, 2024 | 1:14 PM

Recruitment process 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

1 हजार 499 पदांसाठी भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
job
Follow us on

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची आणि वयाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया सविस्तरपणे.

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांच्याकडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून ग्रॅज्युएट टीचर, स्टेनोग्राफर ग्रेड डी आणि असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टरसह अनेक पदे ही भरली जाणार आहेत. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. तब्बल 1 हजार 499 पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही आपण या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. dsssb.delhi.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. dsssb.delhi.gov.in याच साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 एप्रिल 2024 आहे. या तारखेच्या अगोदरच आपल्याला भरतीसाठी अर्ज करावा लागेल. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 32 असावे आणि हेच उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 100 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा ही द्यावी लागणार आहे. फक्त परीक्षाच नाही तर उमेदवारांच्या मुलाखती देखील पार पडणार आहेत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 एप्रिल 2024 आहे.