दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची हीच ‘ती’ मोठी संधी, लगेचच करा अर्ज

| Updated on: Dec 10, 2023 | 2:13 PM

दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट इस्रोमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही संधीच म्हणावी लागणार आहे. ही एक बंपर भरती सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सर्व सविस्तरपणे.

दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची हीच ती मोठी संधी, लगेचच करा अर्ज
Follow us on

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी बातमी आहे. थेट इस्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेला सुरूवात देखील झालीये. नुकताच याबाबतची अधिसूचना इस्रोकडून काढण्यात आलीये. इस्रोकडून ही बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया 9 डिसेंबर 2023 पासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हा दाखल करता येणार आहे. मग काय अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. तंत्रज्ञ बी या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्डाचे दहावी पासचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचा आयटीआय उत्तीर्ण होणेही आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला इस्रोच्या isro.gov.in.साईटवर जाऊन अर्ज दाखल करावा लागणार आहे. यानंतर एक परीक्षा इस्रोकडून उमेदवारांची घेतली जाईल तसेच उमेदवारांना स्किल टेस्ट देखील द्यावी लागणार. यानंतर उमेदवारांची निवड ही इस्रोकडून केली जाणार आहे. मग उशीर न करता आजच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

54 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 500 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांसाठी वयाची अट ही ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 35पर्यंत असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हे दाखल करावेत.

या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी isro.gov.in. या साईटला भेट द्या. तिथूनच तुम्हाला अर्ज देखील करावा लागणार आहे. विशेष म्हणजे तगडी पगार देखील उमेदवारांना देखील येणार आहे. 21700 ते 69,100 पर्यंत पगार या पदांसाठी देण्यात येणार आहे. ही एक बंपर भरती प्रक्रियाच म्हणावी लागणार आहे.