रेल्वे विभागात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, थेट अर्ज करा आणि मिळवा सरकारी नोकरी

| Updated on: Dec 10, 2023 | 12:34 PM

रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ही मेगा भरती आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी लगेचच आपले अर्ज भरावेत. दक्षिण पूर्व रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही रेल्वे विभागाकडून ठेवण्यात आलीये.

रेल्वे विभागात या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, थेट अर्ज करा आणि मिळवा सरकारी नोकरी
Follow us on

मुंबई : रेल्वेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ही बंपर भरती असून ही मोठी संधी असणार आहे. रेल्वेमध्ये विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. नुकताच याबाबतची अधिसूचना ही रेल्वे विभागाकडून काढण्यात आलीये. अधिकृत वेबसाइट rrcser.co.in वर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. दक्षिण पूर्व रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 26 डिसेंबरपर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करू शकता. मग उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा आणि मिळवा थेट सरकारी नोकरी.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही रेल्वे विभागाकडून ठेवण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत होत आहे. विशेष म्हणजे गट C आणि गट D च्या विविध जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25 असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 500 रूपये फिस तर SC/ST/EX या उमेदवारांना 250 रूपये फिस भरावी लागणार आहे. ही फिस आयपीओ किंवा बँक ड्राफ्टद्वारे उमेदवार हे भरू शकतात. बँक ड्राफ्ट किंवा आयपीओ साउथ ईस्टर्न रेल्वे, गार्डन रीच 700043 च्या नावे जारी करणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले भरलेले अर्ज हे सर्व कागपत्रांसह रेल्वे भर्ती सेल, अध्यक्ष, बंगला क्रमांक 12A, गार्डन रीच कोलकाता येथे पाठवावे. ही मोठी संधी उमेदवारांकडे आहे. उशीर न करता आजच इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करावेत. ही मोठी बंपर भरती सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी गट सी 21 पदे आणि गट डीसाठी एकून 33 पदांप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही संधी आहे. विशेष म्हणजे थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही संधी आहे. या भरती प्रक्रियेत ओबीसीच्या उमेदवारांना वयामध्ये सूट ही देण्यात आलीये. चला तर लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.