ना परीक्षा ना मुलाखतीचे टेन्शन, रेल्वेच्या ‘या’ विभागात बंपर भरतीला सुरूवात, थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी

| Updated on: Dec 11, 2023 | 1:06 PM

रेल्वेमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. रेल्वे विभागाने या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिसूचना ही जाहिर केली. या भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहिती जाणून घ्या.

ना परीक्षा ना मुलाखतीचे टेन्शन, रेल्वेच्या या विभागात बंपर भरतीला सुरूवात, थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी
Follow us on

मुंबई : दहावी आणि बारावी पास असलेल्या तरूणांसाठी मोठी संधी आहे. थेट रेल्वेमध्ये नोकरी करण्याची ही संधी आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागाकडून या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिसूचना ही जाहीर करण्यात आलीये. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. ही बंपर भरती प्रक्रिया उत्तर रेल्वेकडून राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी सुरू आहे. अजिबातच वेळ वाया न घालता उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. ही मोठी संधीच दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी नक्कीच आहे.

विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. इतकेच नाही तर कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत उमेदवारांची घेतली जाणार नसल्याचे सांगितले जातंय. 3000 पेक्षाही अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज हा आॅनलाईन पद्धतीने दाखल करावा लागणार आहे. rrcnr.org या साईटवर भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहिती मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 100 रूपये फिस लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत ही घेतली जाणार नाहीये. उमेदवाराची निवड ही थेट मार्कांनुसार केली जाणार आहे. यामुळे इच्छुकांनी अधिक वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करावे. ही मोठी संधीच आहे.

अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना सर्वात अगोदर rrcnr.org या साईटवर जावे लागेल. यानंतर होमपेजला जाऊन ऑनलाइन अॅप्लिकेशनवर क्लिक करा. त्यानंतर उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन हे करून घ्यावे. लॉगिनवर अॅप्लिकेशन अर्ज भरावा. त्यानंतर उमेदवाराला फिस भरावी लागेल. त्यानंतर आपला अर्ज दाखल करून घ्या. भरलेला अर्ज देखील डाउनलोड करावा लागेल.

विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 3,093 पदांसाठी राबवली जातंय. उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्डाचे दहावी पास असण्याचे प्रमाणपत्र आणि तसेच आयटीआय प्रमाणपत्र असणेही आवश्यक आहे. ही मोठी बंपर भरती राबवली जातंय. तसेच या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील ठेवण्यात आलीये. 18 ते 24 वय असलेले उमेदवार हा भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करू शकतात.