506 जागांसाठी भरती, असिस्टंट कमांडंट होण्याची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी

| Updated on: Apr 27, 2024 | 11:53 AM

UPSC Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात अनेकजण असतात. जर तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील काढण्यात आलीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.

506 जागांसाठी भरती, असिस्टंट कमांडंट होण्याची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी
UPSC
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी नक्कीच म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया केंद्रिय लोकसेवा आयोगाकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. असिस्टंट कमांडंट पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 506 पदे ही भरली जाणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत.

या upsconline.nic.in साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे. आपल्याला त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट अर्ज करावीत.

असिस्टंट कमांडंट बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस, सशस्त्र सीमा बल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यासाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून असिस्टंट कमांडंटची पदे भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये.

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 25 असावे. फक्त वयच नाही तर शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा. कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने पदवी घेतलेली असावी. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 200 रूपये फीस ही भरावी लागेल.

https://upsc.gov.in/sites/default/files/CAPF_AC_Exam_2024_ExamNotif_Eng_24042024.pdf येथे उमेदवाराने अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे.