चोरट्यांची दिवाळीत लयलूट; 9 दिवसांत 9 घरफोड्या, नाशिकमधून 7 लाखांचा ऐवज लंपास

| Updated on: Nov 10, 2021 | 3:45 PM

गेल्या 9 दिवसांत चोरट्यांनी तब्बल 9 घरफोड्या करून 6 लाख 89 हजारांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आहे. दिवाळीच्या सुट्टीत चोरांनी लयलूट केली आहे.

चोरट्यांची दिवाळीत लयलूट;  9 दिवसांत 9 घरफोड्या, नाशिकमधून 7 लाखांचा ऐवज लंपास
Follow us on

नाशिकः गेल्या 9 दिवसांत चोरट्यांनी तब्बल 9 घरफोड्या करून 6 लाख 89 हजारांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आहे. दिवाळीच्या सुट्टीत चोरांनी लयलूट केली आहे.

अनेक जण नाशिकमध्ये नोकरीच्या निमित्ताने तात्पुरते रहिवासी असतात. त्यांना दिवाळी म्हटली की गावाचे वेध लागतात. अनेकजण आपले आप्तेष्ट आणि नातेवाईकांना भेटायला जातात. हीच संधी साधून चोरट्यांनी एकामागून एक घरफोड्या केल्या आहेत. त्यात गंगापूर पोलीस ठाणे हद्दी भागात 2, आडगाव 1, सरकारवाडा 1, नाशिकरोड 2, उपनगर 2, अंबड पोलीस हद्दी भागात 1 घरफोडी केली आहे. या नऊ चोऱ्यांतून किमान 6 लाख 89 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळी सणाच्या काळात घरफोडीचे प्रमाण घटले आहे. गेल्या वर्षी या काळात 22 घरफोड्या झाल्या होत्या. दरम्यान याच काळात कॉलेजरोड भागातील डिसुझा कॉलनीतले घर फोडून चोरट्यांनी मोत्याचा हार आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सुप्रतीक दत्ता यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार चोरट्यांनी त्यांच्या तृप्ती अपार्टमेंटमधील अजिंक्य बंगल्याचे पश्चिम बाजूच्या खिडकीचे ग्रील उचकटून आत प्रवेश केला. त्यांनी पन्नाचा खडा असलेला एक मोत्यांच्या मण्यांचा 20000 रुपयांचा हार, 15000 रुपये किमतीची गोल्ड प्लेटींग केलेली चांदीची चैन, गोल्ड प्लेटींग केलेल्या दोन चांदीच्या रिंग, एक 150 ग्रॅम वजनाचा चांदीचा बॉक्स, चांदीचे दोन नाणे, चांदीचा दिवा, पूजचे निरंजन, लोटी, ग्लास, लहान मोठे पूजेचे साहित्य, एक ब्राऊन रंगाची लेदर बॅग, चांदीचे ताट, चांदीच्या वाट्या, चांदीचे ग्लास असा ऐवज चोरून नेला आहे.

3 तोळ्यांचे दागिने लंपास

ठेंगोडा येथे दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने 3 तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, ठेंगोड्याचे माजी सरपंच प्रदीप शेवाळे यांच्या पत्नी ललिता शेवाळे यांना भामट्याने दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगितले. त्यासाठी ललिता शेवाळे यांच्या हातात एक पॉलिशची पावडर दिली. त्यामुळे त्यांना गुंगी आली. हीच संधी साधत दोन भामट्यांनी त्यांच्याजवळचे तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.

मंगळसूत्र खेचले

दुचाकीवर जाणाऱ्या एका महिलेचा दुचाकीवरून पाठलाग करून मंगळसूत्र खेचून नेल्याची घटना नाशिकमधल्या गणपती मंदिराजवळ घडली असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निकिता गायधनी (रा. इंदिरानगर) या पारिजातनगरात वनविहार कॉलनीकडे दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठिमागून दुचाकीवर एक व्यक्ती आला. त्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढला. निकिता यांनी यावेळी आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत चोरटा फरार झाला होता. (9 burglaries in 9 days in Nashik; 7 lakh jewelery stolen)

इतर बातम्याः

साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशित करण्याची मिळणार संधी; अशी करा नावनोंदणी

महापालिकेच्या प्राथमिक शाळांची सुट्टी वाढली; नाशिकमध्ये 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार वर्ग