महापालिकेच्या प्राथमिक शाळांची सुट्टी वाढली; नाशिकमध्ये 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार वर्ग

नाशिकमध्ये महापालिकेच्या प्राथमिक शाळांची सुट्टी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता वर्ग येत्या 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

महापालिकेच्या प्राथमिक शाळांची सुट्टी वाढली; नाशिकमध्ये 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार वर्ग
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 7:21 PM

नाशिकः नाशिकमध्ये महापालिकेच्या प्राथमिक शाळांची सुट्टी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता वर्ग येत्या 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. मात्र, दुसरीकडे माध्यमिकच्या शाळा या 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.

खरे तर कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा 4 ऑक्टोबर 2021 पासून ऑफलाईन स्वरुपात सुरू झाल्या. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एकूण 14 दिवसांची सुट्टीची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. या काळात शाळांकडून सुरू असलेले ऑनलाईन अध्यापनही बंद राहील, असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन दिवाळी सुट्टीची माहिती दिली होती. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. त्यानुसार नाशिकमध्ये जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांना 10 पर्यंत सुटी होती. त्यामुळे त्या 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार होत्या.

अन् शाळांची सुट्टी वाढवली

मात्र, नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी व्ही. एम. कदम यांनी स्वतंत्र परिपत्रक काढून शाळांची सुट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता या शाळांची दिवाळी सुट्टी 20 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सोबतच 21 नोव्हेंबरला रविवार आहे. त्यामुळे त्यांचे वर्ग आता 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. महापालिकेच्या प्राथमिक शाळा या 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार होत्या. याबाबत शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, महापालिका शाळांची सुट्टी वाढवली आहे. आता शाळा 15 नोव्हेंबरपासून सुरू होतील. याबाबतचे परिपत्रक काढण्यात येणार आहे, अशी माहिती टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. मात्र, प्राथमिक आणि माध्यमिकच्या शाळा वेगवेगळ्या तारखांना सुरू होत आहेत. त्यामुळे पालक संभ्रमात आहेत. (Primary municipal schools will start from November 15; Madhyamik will start on 22nd November in Nashik)

इतर बातम्याः

Good News: रानवाटेवर केशराचा पाऊस; भारतात दुर्मिळ झालेल्या लाल मानेच्या ससाण्याचे घडले दर्शन!

मतदार याद्यांमध्ये 48 हजार नावे दुबार; फोटो जुळल्याने फुटले बिंग, नाशिकचा घोळ निस्तारेना

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.