मतदार याद्यांमध्ये 48 हजार नावे दुबार; फोटो जुळल्याने फुटले बिंग, नाशिकचा घोळ निस्तारेना

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये तब्बल 48 हजार मतदारांचे नाव दुबार असल्याचे आढळले असून, त्यांना लवकरच नोटीस पाठवण्यात येणार आहे.

मतदार याद्यांमध्ये 48 हजार नावे दुबार; फोटो जुळल्याने फुटले बिंग, नाशिकचा घोळ निस्तारेना
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 11:53 AM

नाशिकः ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये तब्बल 48 हजार मतदारांचे नाव दुबार असल्याचे आढळले असून, त्यांना लवकरच नोटीस पाठवण्यात येणार आहे.

राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. नाशिकमध्ये मात्र ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमधील दुबार नावाचा मुद्दा गाजतो आहे. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या तीन मतदार संघाच्या याद्यांमध्ये शे-दोनशे नव्हे, तर चक्क तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. शिवसेनेच्या दहा सदस्यांच्या पथकाने हा घोळ उघडकीस आणला आहे. त्यांनी तीन महिन्यांत मतदार यांद्याची अक्षरशः छाननी केली. तेव्हा नाशिक पश्चिम मतदारसंधात 1 लाख 22 हजार 242 मतदार दुबार आढळले. नाशिक पूर्व मतदारसंघात 88 हजार 932 आणि नाशिक मध्य मतदारसंघामध्ये 76 हजार 319 मतदार दुबार असून, मतदार याद्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने ही नावे दुबार घुसवल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या मतदारांच्या बळावरच शहरात भाजपने तीन आमदार निवडून आणले. महापालिकेत 66 नगरसेवकही याच मतदारांमुळे निवडून आले. ही बोगस नावे रद्द करावी, अशी मागणी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केली आहे. त्यानंतर या प्रकाराची चौकशी सुरू आहे.

19916 मतदारांचा नाव वगळ्यासाठी अर्ज

दुबार मतदार नावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू केली आहे. याअनुषंगाने नागरिकांनी दुबार नावे कमी करण्यासाठी मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदार यादीमध्ये कोणी जाणीवपूर्वक दुबार नावे सुरू ठेवली असल्याची बाब निदर्शनास आल्यास अशा व्यक्तिंविरोधात निवडणूक कायद्या अंतर्गत फौजदारी कारवाई सुद्धा होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सोबतच जिल्हा प्रशासनामार्फत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी तालुकास्तरावर व तहसील कार्यालयात कार्यवाही करण्यात येत आहे. त्यातच तब्बल 48 हजार मतदारांचे नाव दुबार असल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे यांचे फोटोही जुळले आहेत. तर 19916 मतदारांनी फॉर्म क्रमांक 7 भरून नाव वगळ्याची विनंती केली आहे. 20 डिसेंबरपर्यंत नवीन नावनोंदणी, दुरुस्ती, नाव वगळ्याची मोहीम सुरू राहणार आहे. त्यानंतर 5 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. (Double the names of 48,000 voters in the electoral rolls of Nashik district)

इतर बातम्याः

ST Strike: नाशिक विभागात 20 कर्मचाऱ्यांचे निलंबन; सर्व डेपोमध्ये आंदोलन तीव्र, प्रवाशांचे प्रचंड हाल!

साहित्य संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा उल्लेख नाही; भूमिपुत्रालाच डावलल्याने नाराजीचे सूर

Non Stop LIVE Update
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.