AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs Pak : भारताविरुद्धच्या मॅचआधीच पाकिस्तान दहशतीत ! हा स्टार खेळाडू ठरणार धोकादायक

15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान T20 वर्ल्ड कप सामन्यात हार्दिक पंड्या भारतासाठी निर्णायक ठरू शकतो. नामिबियाविरुद्धच्या तुफानी खेळीनंतर आणि अष्टपैलू कामगिरीनंतर त्याच्यावर सर्वांचे लक्ष आहे. तो बॅट आणि बॉलने सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता ठेवतो, त्यामुळे पाकिस्तानला हार्दिक पंड्याची धास्ती वाटत आहे. हा स्टार खेळाडू टीम इंडियाला विजय मिळवून देण्यास मदत करू शकतो.

Ind Vs Pak : भारताविरुद्धच्या मॅचआधीच पाकिस्तान दहशतीत ! हा स्टार खेळाडू ठरणार धोकादायक
पाकविरुद्ध भारताचा हा खेळाडू धोकादायक ठरू शकतो
| Updated on: Feb 14, 2026 | 10:04 AM
Share

आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत उद्या, म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी हाय व्होल्टेज सामना रंगणार आहेत. भारत वि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी यांच्यात ही मॅच होणार असून सामन्यापूर्वीच वातावरण चांगलंच तापलं आहे. या मॅचमध्ये भारत पाकिस्तानला लोळवतो की पाक विजयी कामगिरी करून दाखवतो याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींच लक्ष लागलं आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी सध्या ज्या भारतीय खेळाडूची सर्वाधिक चर्चा सुरू आहे, तो म्हणजे टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या. नामिबियाविरुद्धच्या त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे पाकिस्तानच्या छावणीत टेन्शन वाढलं आहे. हा स्टार खेळाडू अतिशय धोकादायक ठरू शकतो.

नामिबियाविरुद्ध केली तूफान कामगिरी

टी-20 वर्ल्डकपमध्ये नामिबियाविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने कठीण परिस्थितीत टीम इंडियाला सावरले. जेव्हा मधल्या फळीवर दबाव येत होता, तेव्हा त्याने फक्त 28 चेंडूत 52 धावांची जलद खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. शिवाय, त्याने महत्त्वपूर्ण विकेट्स घेऊन संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि सामनावीराचा पुरस्कारही मिळवला.

पाकिस्तानच्या माजी कर्णधारानेही केलं कौतुक

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकनेही एका चर्चेदरम्यान भारतीय संघाच्या रणनीतीचे आणि हार्दिकच्या खेळीचे कौतुक केले. खेळपट्टी मंदावल्यानंतर भारतीय फलंदाजांनी परिस्थितीशी जुळवून घेतले आणि स्ट्राईक फिरवून डाव पुढे नेला असं तो म्हणाला. दबावाखाली सामने कसे हाताळायचे हे पाकिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूंना भारतीय खेळाडूंकडून शिकण्याची आवश्यकता आहे असेही मलिकने कबूल केलं.

हार्दिकसारखा ऑलाराऊंडर जगात नाही

दरम्यान, पॅनेलमध्ये उपस्थित असलेल्या आणखी एका तज्ज्ञाने हार्दिक पांड्या, हा इतर कोणत्याही खेळाडूंपेक्षा श्रेष्ठ असल्याचे वर्णन केले आहे. हार्दिक हा असा अष्टपैलू खेळाडू आहे जो फलंदाजी करताना एक विशेषज्ञ फलंदाज आणि गोलंदाजी करताना एक प्रमुख गोलंदाज असल्याचे दिसून येतं. हार्दिकसारखा संतुलित अष्टपैलू खेळाडू केवळ पाकिस्तानातच नाही तर जगातही सापडणे कठीण आहे असंही ते म्हणाले.

15 फेब्रुवारीला ठरू शकतो मॅच विनर

आता उद्या, 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येतील तेव्हा हार्दिक पंड्याची कामगिरी खूप महत्त्वाची ठरणार आहे. तो असा खेळाडू आहे जो, त्याच्या बॅटने आणि बॉलने सामन्याचे चित्र बदलू शकतो. गेल्या काही सामन्यांमधील त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी दिलासादायक आहे. पाकिस्तानच्या संघाकडून, भारतीय टॉप ऑर्डरला लवकर बाद करण्याची रणनीती आखली जाईल, तेव्हा हार्दिकसारखे खेळाडू मधल्या फळीत येऊन गेम चेंजर ठरू शकतात. अशा परिस्थितीत, हार्दिक पुन्हा एकदा त्याच्या ऑलराऊंडर कामगिरीने टीम इंडियाला हा मोठा सामना जिंकण्यास मदत करू शकतो की नाही हे पाहणे महत्वाचे असेल.

Follow Us
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्त
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा