AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?

मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?

| Updated on: Aug 20, 2026 | 11:49 AM
Share

देवेंद्र फडणवीस, काँग्रेस, मानसिक गुलामगिरी, संविधानविरोधी, महाराष्ट्र सरकार, लाडकी बहीण योजना, सिद्धिविनायक फाउंडेशन, संदीप जोशी, अनाथ मुलांसाठी आरक्षण, लाडकी बहीण ई केवायसी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका करत त्यांच्या भूमिकेला मानसिक गुलामगिरी आणि संविधानविरोधी ठरवले आहे. यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या काही सामाजिक उपक्रमांचीही माहिती दिली. सिद्धिविनायक फाउंडेशनच्या मदतीने कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांना आधार देण्याच्या योजनेचा त्यांनी उल्लेख केला. संदीप जोशी यांच्या नेतृत्वात २९३ कुटुंबांना मदत मिळाल्याचे आणि १०० कुटुंबांची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारल्याचे सांगितले. त्यापैकी एका एकल मातेच्या विवाहाचे उदाहरण देत, पुढील काळात ३०० मुलींच्या विवाहाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महाराष्ट्र सरकारने अनाथ मुलांसाठी दिलेल्या एक टक्का आरक्षणाबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले. या आरक्षणामुळे अनेक गरीब आणि अनाथ मुलांना सरकारी नोकऱ्या मिळत आहेत. कठोर मेहनतीने परीक्षा देऊनही आधार नसलेल्या मुलांना जेव्हा यामुळे संधी मिळते, तेव्हा मनाला समाधान वाटते, असे फडणवीस म्हणाले.

याचबरोबर, फडणवीस यांनी लाडकी बहिणी या सरकारी योजनेची बाजू मांडली.  या योजनेत ई-केवायसी तपासणी, आयकर भरणारे कुटुंब, पुरुष लाभार्थी आणि सरकारी कर्मचारी यांना वगळण्यात आले. काँग्रेसने या योजनेला सुरुवातीपासून विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र आता तेच काँग्रेस नेते योजनेबाबत ‘मगरमच्छ के आँसू गाळत’ असल्याची टीका फडणवीस यांनी केली. ज्या बहिणींना मदतीची गरज आहे, त्यांच्यासाठी ही योजना आहे आणि ती निरंतर सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. मात्र यामध्ये काही बहिणी अश्याही आहेत, ज्या गरजू आणि गरीब महिला असून त्यांनी ई- केवायसी केली नसल्यामुळे त्या अपात्र ठरल्या.

Published on: Aug 20, 2026 11:49 AM

Follow Us