पगाराचे राहिलेले पैसे मागितल्याचा राग, दुकान मालकाकडून कामगारावर हल्ला

| Updated on: Dec 01, 2022 | 9:08 PM

छोटूने केलेल्या तक्रारीनुसार कळंबोली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत दोन्ही आरोपी कळंबोली पोलिसांच्या ताब्यात आहेत.

पगाराचे राहिलेले पैसे मागितल्याचा राग, दुकान मालकाकडून कामगारावर हल्ला
दुकान मालकाकडून कामगारावर हल्ला
Follow us on

नवी मुंबई : पगाराचे राहिलेले पैसे मागायला गेलेल्या कामगारावर दुकान मालकासह सहकाऱ्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील कळंबोली येथे घडली आहे. या हल्ल्यात कामगार गंभीर जखमी झाला आहे. जखमी कामगारावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. छोटू रामसागर राय असे जखमी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 1 परिसरात असलेल्या ए वन स्वीट मार्ट या दुकानात कामाला आहे. याच ठिकाणी आरोपी संतोष पासवान याचे खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान आहे. छोटू राय हा काही दिवसांपूर्वी पासवान याच्या दुकानात कामाला होता.

काय आहे प्रकरण?

पासवान याने छोटूच्या पगाराचे पैसे बाकी ठेवले होते. ते पैसे मागण्यासाठी छोटू हा पासवान याच्याकडे गेला होता. यावेळी पासवान याने छोटूवर चोरीचा आरोप करत शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरवात केली.

हे सुद्धा वाचा

मारहाणीत कामगार गंभीर जखमी

यावेळी तिथे हजर असलेला दुकान मालक हसुराम चौधरी याने देखील पासवान याला साथ देत छोटूला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी झालेल्या झाटापटीत पासवान याने मारहाणीसाठी हत्याराचा वापर केल्याने छोटू याच्या डोक्यात आणि पोटात गंभीर दुखापत झाली आहे.

कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

छोटूने केलेल्या तक्रारीनुसार कळंबोली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत दोन्ही आरोपी कळंबोली पोलिसांच्या ताब्यात आहेत.