खारघर येथे शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि रायगड मधील तीन आमदारांचे पुतळे जाळले. भरत गोगावले, महेंद्र दळवी , महेंद्र थोरवे यांचे पुतळे शिवसैनिकांनी जाळले आहेत. या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी शिंदे गटा विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
घटनेतील फिर्यादी आपल्या मित्रासह कामावर जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका मोटर सायकलस्वाराने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून पळ काढला. फिर्यादीने तुर्भे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कल्याण येथील इराणी वस्ती, आंबिवली कल्याणमध्ये सतत तीन दिवस गस्त घालत आरोपीला ताब्यात
Maharashtra MLC Election: कालच्या बैठकीत रणनीती तयार झाली. 20 तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून येतील अशी तयारी झालेली आहे. आज देखील महाविकास आघाडीची बैठक आहे.
मारहाण करणारे सर्व तरुण मूळचे कोपरखैरणे आणि पुणे येथील रहिवासी आहेत. लाऊंजमध्ये गर्दी असल्याने या तरुणांना आतमध्ये जाण्यास बाऊंसरकडून मनाई करण्यात आली. याचा राग अनावर झाल्याने बाहेर असलेल्या सामानाची तोडफोड करत लाऊंजच्या बाऊन्सरला बेदम मारहाण केली.
समद खान हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्याने अशा प्रकारचे 11 गुन्हे केले होते. त्यात त्यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याच प्रकारचे गुन्हे करीत होता. आरोपीस एकास पोलीस कस्टडी सुनावली आहे तर दुसऱ्या आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आमच्या साहेबांनी त्यांच्यावर अंत्यत विश्वासाने नवी मुंबई सोपवली होती. पण त्याने नवी मुंबईचे रक्त शोषले. त्यांनी सर्व नवी मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.