उरणमध्ये चड्डी-बनयान गँगचा हैदोस, 25 लाख लंपास, सीसीटीव्हीत चोरटे कैद

उरण तालुक्यातील वेश्वी गावात गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चार घरांमध्ये घरफोड्या करून अंदाजे 25 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. गेल्या वर्षीही अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण आहे आणि पोलिस तपास करत आहेत.

उरणमध्ये चड्डी-बनयान गँगचा हैदोस, 25 लाख लंपास, सीसीटीव्हीत चोरटे कैद
उरणमध्ये चड्डी-बनयान गँगचा हैदोस, 25 लाख लंपास, सीसीटीव्हीत चोरटे कैद
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 5:22 PM

थंडीची चाहूल लागायला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि अशातच उरण तालुक्यावर एक मोठं संकट घोंघावत आहे. उरण तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. उरण तालुक्यात रात्रीच्या दाट अंधाराचा फायदा चोरांनी घेतलाय. उरणच्या वेश्वी गावातील चार घरांमध्ये अज्ञात चोरांनी घरफोड्या केल्या. अज्ञात चोरट्यांनी बंद घरांच्या कड्या आणि खिडक्यांचे लॉक तोडून घरात प्रवेश करत, कपाटातून अंदाजे २५ लाखांचा ऐवज लंपास केला. या संपूर्ण घटनेचा खळबळजनक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, घरमालकांनी पोलिसांना तत्काळ सूचित केले. संबंधित घटना ही गुरुवारी 28 नोव्हेंबरच्या रात्री घडली.

गेल्या वर्षी देखील उरण तालुक्यात घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पोलिसांसोबतच गावकऱ्यांनी देखील जागते रहो हा नारा दिला होता. वर्षापूर्वीच काही संतप्त नागरिकांनी चोरीसाठी वापरली जाणारी गाडी सुद्धा जाळून टाकली होती. मात्र त्यावेळी चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले होते. मात्र आता एक वर्षानंतर पुन्हा, थंडीची चाहूल लागली आणि चड्डी-बनयान गँगने उरणकडे आपला मोर्चा वळविला आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री वेश्वी गावात या चोरट्यांनी थंडीचा फायदा घेत, घरांच्या कड्या आणि खिडक्यांचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. प्रभाकर पाटील, शशिकांत मुंबईकर, हसुराम मुंबईकर आणि राज सागर मुंबईकर या चार रहिवाशांच्या घरांमध्ये चोरी झाली आहे. चोरट्यांच्या या धाडसामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांच्या वाढत्या घरफोडीच्या घटनेने संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरांमध्ये सुरक्षेसाठी सर्वजण सजग झाले आहेत, आणि पोलिस यंत्रणा देखील घटनेचा तपास करत आहेत.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.