AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा 9/11 सारखा भयानक हल्ला, अमेरिकेला उद्ध्वस्त करणारा कट, इराणने थेट… हादरवून टाकणारी माहिती समोर

Iran vs US : इराणकडून एक मोठा दावा करण्यात आला आहे. एक नेटवर्क अमेरिकेत 9/11 सारखा हल्ला घडवून आणण्याची योजना आखत आहे असं इराणने म्हटले आहे, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली आहे.

पुन्हा 9/11 सारखा भयानक हल्ला, अमेरिकेला उद्ध्वस्त करणारा कट, इराणने थेट... हादरवून टाकणारी माहिती समोर
9 11 AttackImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 15, 2026 | 6:07 PM
Share

अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर भीषण हल्ले होत आहेत. अशातच आता इराणकडून एक मोठा दावा करण्यात आला आहे. इराणने म्हटले की जेफ्री एपस्टीनच्या मित्रांचे एक नेटवर्क अमेरिकेत 9/11 सारखा हल्ला घडवून आणण्याची योजना आखत आहे. असा हल्ला झाल्यानंतर या हल्लाचा आरोप इराणवर केला जाऊ शकतो. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध आणखी तीव्र होत असताना हा दावा करण्यात येत आहे. अमेरिकेना एका आठवड्यात युद्ध जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते, मात्र अद्याप यात यश आलेले नाही. याच काळात इराणने खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेवर भीषण हल्ला होणार

इराण आणि अमेरिकेतील युद्धाबाबत इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचे प्रमुख सल्लागार अली लारिजानी यांनी सोशल मीडियावर इराणची भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले की, ‘मी ऐकले आहे की एपस्टीन नेटवर्कचे उरलेले सदस्य 9/11 सारखी घटना घडवून आणण्याची योजना आखत आहेत. त्यानंतर या हल्ल्याचा आरोप इराणवर टाकण्याचा त्यांचा विचार आहे. इराण अशा कोणत्याही दहशतवादी कटाचा विरोध करतो आणि आमचे अमेरिकन जनतेशी कोणतेही युद्ध नाही.’ लाजीरानी यांच्या या विधानानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली आहे.

ट्रम्प यांच्यावर टीका

इराण आणि अमेरिका या देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून अलि लारिजानी सतत अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी ट्रम्प यांना एपस्टीनचा जवळचा मित्र म्हटले होते. एका परेडदरम्यान अमेरिकन जनतेला संबोधित करताना लारिजानी यांनी म्हटले होते की, ‘इराणचे नेते लोकांमध्ये राहतात, पण अमेरिकेचे नेते एपस्टीन आयलंडवर राहतात. ट्रम्प यांचे नाव जेफ्री एपस्टीनच्या फाइल्समध्ये अनेकदा समोर आले आहे.’ ट्रम्प यांचे विरोधक असेही म्हणतात की एपस्टीन फाइल्समधून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ट्रम्प यांनी व्हेनेझुएला आणि इराणवर हल्ला केला आहे.

एपस्टीन फाईल्समुळे अनेकजण अडचणीत

दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की, त्यांचा आणि एपस्टीनचा कोणताही विशेष संबंध नव्हता आणि ते कधीही एपस्टीन आयलंडवर गेले नाहीत. मात्र तरीही ट्रम्प विरोधक त्यांना एपस्टीनचा जवळचा सहकारी मानत आहेत. एपस्टीनवर अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार, मारहाण, आर्थिक गैरव्यवहार आणि अपहरण यांसारखे गंभीर आरोप होते. एपस्टीनचा मृत्यू झाला असला तरी अमेरिकन गुप्तचर संस्थांनी याची चौकशी केली होती. यातील माहिती आता सार्वजनिक होत आहे. यात जगातील अनेक प्रसिद्ध लोकांचा समावेश होता.

Follow Us
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट