AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel US Iran War : अमेरिकेने इराणवर सोडले आण्विक क्षमतेचे बी-52 बॉम्बर, किती आहे खतरनाक ?

अमेरिकेने इराणवर आण्विक बॉम्ब टाकण्यास सक्षम असलेले सर्वाज जुने आणि विश्वासार्ह बी-52 बॉम्बर विमान सोडले आहे. हे विमान खूप घातक आणि खोलवर हल्ले करण्यासाठी ओळखले जाते.

Israel US Iran War : अमेरिकेने इराणवर सोडले आण्विक क्षमतेचे बी-52 बॉम्बर, किती आहे खतरनाक ?
B-52 bomber Nuclear Power
| Updated on: Mar 15, 2026 | 5:35 PM
Share

Iran War : इराण आणि इस्राईल – अमेरिकेचे युद्ध सुरु होऊन पंधरवडा उलटला आहे. या युद्धामुळे इराणचे प्रचंड नुकसान झाले असले तर आर्थिकदृष्ट्या अमेरिका आणि इस्राईलला हे युद्ध भारी पडले आहे. आता अमेरिकेने ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत इराणवर आपले सर्वात जुने परंतू सर्वात घातक स्ट्रॅटेजिक बॉम्बर बी-52 स्ट्रॅटोफोर्टेस (B-52H Stratofortress)ला सक्रीय रुपाने तैनात केले आहे. हे बॉम्बर विमान १९५० च्या दशकापासून सेवेत असून आधुनिकीकरणामुळे आजही अमेरिकी आण्विक त्रयीचा महत्वाचा भाग आहे.

बी-52 बॉम्बरची खासियत

बी-52 आण्विक बॉम्ब आणि आण्विक क्रुझ क्षेपणास्रे (उदा. AGM-86 ALCM)वाहून नेऊ शकते.

हे अमेरिकेच्या आण्विक निरोधक रणनितीचा एअर बेस्ड भाग आहे. जे जमीन, समुद्र आणि हवेतून आण्विक हल्ला करण्याची ताकद ठेवते. इराण युद्धात आतापर्यंत केवळ पारंपारिक शस्रास्रांचा वापर झाला आहे. परंतू आण्विक क्षमतेच्या या विमानाला डुम्सडे बॉम्बरचा दर्जा मिळालेला आहे.

या विमानाची पेलोड क्षमता सुमारे ७० हजार पौंड आहे. म्हणजे हे विमान ३२ टनापर्यंत शस्रास्रे वाहून नेऊ शकते. यात प्रेसिजन- गायडेड बॉम्ब, क्रुझ मिसाईले, माईन्स आणि अन्य मुनिशन सामील आहेत. हे विमान १४ हजार किमीहून जास्त रेंजचे असून ५० हजार फूट उंचावरुन ते उडू शकते.

हे विमान दूरवरुन स्टँड ऑफ हल्ले करु शकते. म्हणजे हे शत्रूच्या एअरस्पेसमध्ये खोलवर न जाता हल्ले करु शकते. फेब्रुवारी २८ पासून इराण सोबत सुरु झालेल्या ऑपरेशनमध्ये बी – ५२ ने इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल साईट्स, कमांड एण्ड कंट्रोल पोस्ट्स आणि अन्य स्ट्रॅटेजिक ठिकाणांवर हल्ले केले आहेत.

मार्चमध्ये आतापर्यंत बी – ५२ ब्रिटनच्या RAF फेअरफोर्ड बेसवर तैनात केले गेले. तेथून त्यांनी इराणवर हल्ला करण्यासाठी उड्डाण घेतले आहे.

CENTCOM नुसार पहिल्या १०० तासात २००० हून जास्त साईट्सना टार्गेट केले आहे. ज्यात बी-५२, बी-१ आणि बी-२ बॉम्बरचा समावेश केला होता.

किती खतरनाक आहे?

बी-५२ ची ताकद केवळ आण्विक क्षमतेत नाही याची विश्वासार्हता आणि मोठ्या प्रमाणावर हल्ल्याची क्षमता आहे. इराणच्या एअर डिफेन्सला आधीच कमजोर करण्यात आले आहे. ज्यामुळे बी-५२ जास्त जोखीम न घेता खोलवर हल्ले करु शकते. जर आण्विक युद्धाची वेळ आली तर जगासाठी मोठे संकट येऊ शकते. परंतू सध्या तरी अमेरिकेने पारंपारिक हल्ल्यांवरच लक्ष केंद्रीत केले आहे.अमेरिकेची मिसाईल आणि कमांड सेंटरला नष्ट करण्यासाठी याचा वापर होतो आहे. हे बॉम्बर अमेरिकन वायू शक्तीचे प्रतिक असून जे दशकाहून अधिक जूने असले तरी शत्रूंसाठी आजही काळ बनू शकते.

Follow Us
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!