AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran US Israel War: आता तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात, ट्रम्प यांच्या घोषणेने इराण हादरले

होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गांपैकी एक आहे आणि ट्रम्प म्हणाले की प्रस्तावित मोहिमेचा उद्देश हा जलमार्ग खुला, सुरक्षित आणि मुक्त ठेवणे असणार आहे.

Iran US Israel War: आता तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात, ट्रम्प यांच्या घोषणेने इराण हादरले
donald trump
| Updated on: Mar 14, 2026 | 9:28 PM
Share

इराणवर इस्राईल-US ने हल्ला केल्यानंतर गेले पंधरा दिवस युद्ध पेटले आहे. या युद्धामुळे जगातील अनेक देशांवर इंधन संकट आले आहे. इराणने होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिल्यानंतर इंधन आणि गॅस आणणारी अनेक जहाजे अडकली आहेत. इराण आणि अमेरिका युद्धा दरम्यान आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज सामुद्रधुनी स्वतंत्र करणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज स्ट्रेट बंद झाल्याने ज्या देशांची जहाजे अडकली आहेत, त्यांनाच आता युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे.

एका वक्तव्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिकेने इराणीची १०० टक्के मिलिट्री कॅपेबिलिटी समाप्त केली आहे. परंतू जगाला इशारा देताना त्यांनी सांगितले की इराण अजूनही ड्रोन, माईन्स वा कमी पल्ल्याच्या मिसाईलचा वापर करुन शिपिंगमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करु शकतो.

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, फ्रान्स, जपान, साऊथ कोरिया आणि युके सारख्या देशांना या भागात सैन्य पाठवण्याचे अपिल केले आणि सांगितले की यामुळे होर्मुजला एका अशा देशापासून धोका राहणार नाही ज्याचे डोके संपूर्णपणे नष्ट केले आहे.

इराणच्या सैन्याचे मोठे नुकसान

आपल्या संदेशात ट्रम्प यांनी दावा केला की युनाएटेड स्टेट्सने आधीच इराणची १०० टक्के मिलिट्री क्षमता नष्ट केली आहे. मात्र, तरीही काही प्रमाणात इराणकडून प्रतिकार होऊ शकतो. त्यामुळे समुद्री मार्गाने प्रवास करताना जहाजांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

इराणचे मोठे नुकसान या युद्धात झालेले असेल तरी इराण होर्मुज स्ट्रेट सोबत त्याच्या आत ड्रोन, सी माईन्स वा कमी पल्ल्याची क्षेपणास्रे या सारखी संकटे आणू शकतो. त्यामुळे डोनाल्ड यांनी सल्ला दिला की या कारवाईने या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना असलेला धोका संपलेला नाही.

अमेरिकेने दिला इशारा

अमेरिकने सैन्य संभाव्य धोक्यांना उत्तर देताना किनारपट्टीत मिलिट्री ऑपरेशन सुरु ठेवले जाऊ शकते असे म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की युनाएटेड स्टेट्स किनारी भागात हल्ला करेल.जर गरज वाटली तर या भागातील इराणी जहाजांना निशाना केले जाऊ शकते.

ट्रम्प यांनी सांगितले की आम्ही लवकरच होर्मुज स्ट्रेट उघडून सुरक्षित आणि मुक्त करु. आणि सांगितले की या स्थितीवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे तोडगा काढला जाईल. ट्रम्प म्हणाले की स्ट्रेटमुळे त्रस्त देशांनी या भागात नौदलाची जहाजे पाठवून मदत हा मार्ग मोकळा करायला हवा. हा मार्ग सुरु राहिल्याने जगावरील संकट टळेल असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल