AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझी नक्कल पण मला बोलावलंसुद्धा नाही..; सूरज चव्हाणचं दुखावलं मन, नेमकं काय घडलं?

माझी नक्कल केली, पण मला बोलावलंसुद्धा नाही. एका कोपऱ्यात मला जागा दिली असती तरी चाललं असतं.. अशा शब्दांत सूरज चव्हाणने नाराजी व्यक्त केली आहे. युट्यूब चॅनलवर त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

माझी नक्कल पण मला बोलावलंसुद्धा नाही..; सूरज चव्हाणचं दुखावलं मन, नेमकं काय घडलं?
Suraj Chavan Image Credit source: Youtube
| Updated on: Mar 15, 2026 | 6:13 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजेच ‘झी चित्रगौरव पुरस्कार 2026’ नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, अंकुश चौधरी , गौतमी देशपांडे, समीर चौघुले, ऋजुता देशमुख, पर्ण पेठे, पुष्कराज चिरपुटकर, रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, प्रिया बेर्डे, अमृता सुभाष, भारत जाधव, अमृता खानविलकर, ऋता दुर्गुळे, ललित प्रभाकर यांची उपस्थिती पहायला मिळाली. या पुरस्कार सोहळ्यात भाऊ कदम, निलेश साबळे यांच्यासोबत काही कलाकारांनी मजेशीर स्किट सादर केलं. या स्किटदरम्यान ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाणची नक्कल करण्यात आली. या नक्कलबाबत सूरजने नाराजी व्यक्त केली आहे.

सूरजने त्याच्या युट्यूब चॅनलवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तो म्हणाला, “माझं मन प्रचंड दुखावलं आहे. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात माझं कॅरेक्टर प्ले करण्यात आलं. याचा मला प्रचंड आनंद आहे. पण त्याचसोबत माझ्या मनात एक खंत आहे. ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आहे. झी चित्र गौरवची टीम खूप मोठी आहे. त्यांनी मला बोलावलं असतं आणि कुठल्या तरी कोपऱ्यात एक जागा दिली असली तरी मला बरं वाटलं असतं. पण त्यांनी मला बोलावलं नाही, फोनसुद्धा केला नाही. यामुळे माझं मन दुखावलं गेलंय.”

सूरज चव्हाण म्हणून माझं कॅरेक्टर त्यांनी उत्तम साकारला आहे. ते पाहून मी खुश आहे आणि प्रेक्षकसुद्धा खुश होतील. पण सोहळा सुरू असताना एका बाजूला मी कुठेतरी तिथे पाहिजे होतो, एवढीच माझी अपेक्षा होती. मी माझ्या चाहत्यांना देव मानतो. तुम्हाला आणि महाराष्ट्राला मी एकच प्रश्न विचारतो की मला त्या सोहळ्याला बोलावलं पाहिजे होतं की नाही”, असा सवाल सूरजने चाहत्यांना केला आहे. सूरजच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘दादा तू ब्रँड आहेस, मग तुझी कॉपी होणारच ना’, असं एकाने लिहिलंय. ‘तुझ्यासोबत आम्ही चाहते आहोत, काळजी नसावी’, असं दुसऱ्या चाहत्याने म्हटलं आहे.

Follow Us
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला...
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी...
शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला गौप्यस्फोट
Sanjay Raut UNCUT | मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं? शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट
ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत माहिती
Big Breaking | ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत सर्वात मोठी अपडेट; राजकारणातील घडमोडींना वेग
विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
Vidhan Parishad Election Result | विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या नेत्याचा पराभव करत दणदणीत विजय
दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर
Nashik Gite Vs Darade Rada | दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण सरदेसाई, 15 कोटी अन् बरंच काही...
नागपुरात भाजपचा झेंडा फडकला; राजीव पोतदार विजयी, काँग्रेसला मोठा धक्का
Nagpur Vidhan Parishad Result | नागपुरात भाजपचा झेंडा फडकला; राजीव पोतदार विजयी, काँग्रेसला मोठा धक्का
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराड
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराडे म्हणाले, शिंदेच...
नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय
Nashik Gokul Gite | नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय, महायुतीला धक्का