Sanjay Raut UNCUT | मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं? शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत….; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या विजयावर भाष्य करताना राऊत यांनी हा निकाल महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणि मतदारांच्या रोषाचे प्रतीक असल्याचा दावा केला.
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या विजयावर भाष्य करताना राऊत यांनी हा निकाल महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणि मतदारांच्या रोषाचे प्रतीक असल्याचा दावा केला.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यानंतरही मतदारांनी विरोधातील उमेदवाराला मतदान केले, हा एक प्रकारचा राजकीय चमत्कार असल्याचे त्यांनी म्हटले. मतदानासाठी एकत्र ठेवण्यात आलेले मतदार अखेर शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात गेले, यावरून महायुतीतील नाराजी स्पष्ट दिसून येते, असा दावा त्यांनी केला.
राऊत यांनी पुढे सांगितले की, गोकुळ गीते यांनी शिवसेनेकडे सहकार्याची मागणी केली होती आणि ठाकरे गटाने त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांच्या विजयात ठाकरे गटाच्या मतांचाही वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिंदे गटात आणि भारतीय जनता पक्षात नक्की कोणत्या प्रकारची संबंध आहेत, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर जरी तुम्हाला आज हसू दिसत असले शिंदे बाजूला असताना तर ते हसू खोटे आहे. दिल्लीमधून शिंदेंना बळ दिले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांची ताकद कमी करण्यासाठी. आमच्यासारखे जे लोक आहेत, ते या घडामोडींकडे सध्यातरी दुरून पाहत आहेत.
नाशिकमधील निकाल हा केवळ एका जागेचा निकाल नसून, गद्दारीच्या राजकारणाविरोधातील जनतेचा संदेश असल्याचे राऊत यांनी म्हटले. पैशाच्या जोरावर पक्ष फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात जनतेत नाराजी असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Jun 22, 2026 12:05 PM
शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला गौप्यस्फोट
ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत माहिती
विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या

