AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: तो एक सल्ला अन् श्रीलंकेला हादरवून सोडलं, वैभवच्या रेकॉर्डब्रेक खेळीमागे एक मराठी माणूस जबाबदार

त्रिकोणीय मालिकेत श्रीलंकेविरुद्धच्या फायनल सामन्यात वैभव सूर्यवंशीचे तुफान पाहायला मिळाले. सुरुवातीच्या काही सामन्यात वैभवला काही आपला सूर गवसत नव्हता. पण फायनलमध्ये अचानक त्याने आपली कामगिरी करुन दाखवली ज्यामुळे सर्वत्र त्याची चर्चा झाली. पण यामागे कोणाचा हात आहे ते आता वैभवने बोलून दाखवले.

Vaibhav Sooryavanshi: तो एक सल्ला अन् श्रीलंकेला हादरवून सोडलं, वैभवच्या रेकॉर्डब्रेक खेळीमागे एक मराठी माणूस जबाबदार
vaibhav sooryavanshi
| Updated on: Jun 22, 2026 | 12:07 PM
Share

आयपीएल 2026 मध्ये धावांचा पाऊस पाडल्यानंतर, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी मोठ्या अपेक्षांसह श्रीलंकेत दाखल झाला, पण मालिकेची त्याची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्याने सुरुवातीच्या काही सामन्यात धावा केल्या नाहीत. पण श्रीलंका अ विरुद्धच्या फायनल सामन्यात तो आपल्या लयीत पुन्हा आला. त्याने चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. केवळ 11 चेंडूंत त्याने अर्धशतक ठोकले आणि सर्वत्र चर्चा झाली. वैभवने 29 चेंडूंमध्ये 94 धावा ठोकल्या. वैभवचा खेळ अचानक बदलल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नेमके काय घडले ज्यामुळे त्याने वादळी खेळी खेळली. आता वैभवने श्रीलंका ‘अ’ संघावरील विजयानंतर, अशी वादळी खेळी खेळण्यामागे त्याला कशाने प्रेरणा दिली हे स्पष्ट केले.

मालिकेतील आपल्या पहिल्या चार डावांमध्ये वैभव सूर्यवंशीने एकूण 117 धावा केल्या. प्रत्येक वेळी त्याला चांगली सुरुवात मिळाली, पण तो त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करू शकला नाही. मात्र, अंतिम सामन्यात त्याने लिस्ट ‘अ’ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम मोडला आणि केवळ 11 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला. तो 29 चेंडूंमध्ये 94 धावांवर बाद झाला आणि त्याने श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध भारत ‘अ’ संघाच्या 377/9 या सामना-विजयी धावसंख्येचा पाया रचला.

वैभवला मिळाला खास सल्ला

सूर्यवंशी फॉर्ममध्ये परत येण्यास मदत केल्याबद्दल भारत ‘अ’ संघाचे प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांना श्रेय देतो. स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, सूर्यवंशी म्हणतो की, “जेव्हा मी धावा करत नव्हतो, तेव्हा मी काही गोष्टींवर चर्चा करण्यासाठी कानिटकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मला मुक्तपणे खेळण्याचे स्वातंत्र्य दिले. सुरुवातीला मी खूप जास्त प्रयत्न करत होता, पण कानिटकर यांनी मला आतापर्यंत यशस्वी ठरलेल्या पद्धतीलाच चिकटून राहण्याची आठवण करून दिली. परिस्थिती थोडी वेगळी होती, त्यामुळे सुरुवातीला मला काही आव्हानांचा सामना करावा लागला. त्यामुळे, मी खूप जास्त प्रयत्न करत होतो पण आपल्या योजना योग्यरित्या अंमलात आणू शकत नव्हतो.” तेव्हाच त्यांनी त्याला सांगितले की, तुझा नैसर्गिक खेळ खेळ आणि जास्त विचार करू नकोस.”

Follow Us
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट