AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : रेवती सुळेच्या लग्नात संजय राऊत – जया बच्चन यांचा मराठीत संवाद, बिग बी पहातच राहिले…

Jaya Bachchan Sanjay Raut Viral Video : सुप्रिया सुळे यांची लेक रेवती आणि सारंग लखानी यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला राजकारण, उद्योग, मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, हे बाहेर पडत असताना संजय राऊतही तिथे होते. त्यावेळी जया बच्चन आणि संजय राऊत यांचा मराठीतला संवाद चांगलाच व्हायरल झालाय.

Viral Video : रेवती सुळेच्या लग्नात संजय राऊत - जया बच्चन यांचा मराठीत संवाद, बिग बी पहातच राहिले...
संजय राऊत यांना पाहून काय म्हणाल्या जया बच्चन ?
| Updated on: Jun 22, 2026 | 12:12 PM
Share

Jaya Bachchan Sanjay Raut Viral Video : राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार (NCP-SP) सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि भाजप नेते अरूण लखानी यांचे पुत्र, सारंग यांचा मुंबईत 20 जून रोजी विवाह पार पडला. शरद पवारांच्या नातीच्या या हाय-प्रोफाईल लन्गाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. शनिवारी रेवती आणि सारंग विवाहबंधनात अडकले. या लग्नाला राजकारण, उद्योग तसेच मनोरंजन क्षेत्रातील अनेक मोठमोठे सेलिब्रिटीही आले होते. रेवती आणि सारंग या नवविवाहीत जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी बिग बी अर्थात अमिताभ बच्चन आणि जया बच्चनही आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची लाडकी लेक श्वेताही लग्नाला हजर होती. आता याच लग्नादरम्यानच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अभिनेत्री जया बच्चन या शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी मराठीत संवाद साधताना या व्हिडीओत दिसल्या अून सगळीकडे व्हायरल झालेल्या या व्हिडीओची खूप चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासह अनेकजण चालताना दिसले. त्यानंतर एका क्षणी जया बच्चन यांनी संजय राऊत मराठीत प्रश्न विचारला, “तुम्ही श्वेताला भेटलात का?” ते ऐकून त्यावर संजय राऊत म्हणाले, “हो, मी तिला भेटलो ना.” हे ऐकून जया बच्चन हसल्या आणि शेजारी असलेल्या महिलेला त्यांनी सांगितलं, “श्वेता यांची खूप मोठी फॅन आहे.” त्यांच्या मागे चालणारे अमिताभ बच्चन, जय बच्चन यांचं हे मराठीतलं बोलणं ऐकतच राहिले.

जया बच्चन – संजय राऊत यांचा व्हिडीओ व्हायरल

संजय राऊत हे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आक्रमक नेते मानले जातात. ते अनेकदा बेधडकपणे आपलं मत मांडताना दिसतात. तर अभिनेत्री जया बच्चन या राज्यसभेच्या खासदारही आहेत; त्यामुळे अनेक राजकारण्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नातील त्यांचा हां संवाद म्हणूनच बराच व्हायरल झाला आहे. जया बच्चन या संजय राऊत यांच्याशी मराठीत बोलत होत्या, तेव्हा अमिताभ बच्चन त्यांच्या अगदी मागेच दिसत होते. आता जया बच्चन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

रेवतीच्या लग्नात दिग्गज सेलिब्रिटींची मांदियाळी

रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहाला अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली. लग्नाच्या आदल्या दिवशी झालेल्या संगीत समारंभात अनेक चित्रपट तारकांनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमाला शाहरुख खाननेही उपस्थिती लावली; त्याने मंचावर अतिशय उत्साहाने डान्स तर केलाच पण इतरांनाही नाचायला भाग पाडले. संगीत सोहळ्यात गायक राहुल वैद्यने आपल्या आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या विवाहसोहळ्यात रणबीर कपूर आणि रवी किशन यांसारखे कलाकारही दिसून आले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांनीही या या सोहळ्याला हजेरी लावली नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट