अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराडे म्हणाले, शिंदेच…
नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवल्याची चर्चा असून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

“माझा विश्वासघात झाला आहे. महायुतीच्या लोकांनी माझा विश्वासघात केला,” अशी प्रतिक्रिया नरेंद्र दराडे यांनी दिली. “एकनाथ शिंदे साहेब सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझा घात केला,” असंही ते म्हणाले.
“महायुतीमध्ये असून सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा विश्वासघात केला आहे. आतून त्यांना पाठिंबा दिला. त्यांचे पेपर वाटून त्यांना ताकद दिली. मी आशेवर राहिलो. मी आशेवर राहिल्यानंतर मी कुठेतरी कमी पडलो,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, गोकुळ गीते यांना भाजपच्या काही नेत्यांसह शिंदे गटातील एका आमदाराने पडद्यामागून मदत केल्याची चर्चा रंगली आहे. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
Published on: Jun 22, 2026 10:26 AM
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक