AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayush Mhatre : ये आयुष दादा, वर्ल्ड कप विनर कॅप्टनच्या ऑटोग्राफसाठी छोट्यांची गर्दी, पाहा व्हीडिओ

Ayush Mhatre Grand Welcome In Virar : आयुष म्हात्रे याच्या कर्णधारपदात ज्युनिअर टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करत इतिहास घडवला. भारताने संपूर्ण स्पर्धेत अंजिंक्य राहत आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. त्यानंतर आता आयुषची विरारमध्ये जंगी स्वागत करुन विजयी मिरवणूक काढण्यात आली.

Ayush Mhatre : ये आयुष दादा, वर्ल्ड कप विनर कॅप्टनच्या ऑटोग्राफसाठी छोट्यांची गर्दी, पाहा व्हीडिओ
Ayush Mhatre Grand Welcome In VirarImage Credit source: ANI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 09, 2026 | 1:47 AM
Share

भारताने मराठमोळ्या आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात इंग्लंडला पराभूत करुन अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपली मोहोर उमटवली.  आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026  विजयानंतर भारतीय संघाचं रविवारी संध्याकाळी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळेस क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येत उपस्थित होते. खेळाडूंनी चाहत्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला आणि देशवासियांसह वर्ल्ड कप विजयाचा आनंद साजरा केला. त्यानंतर सर्व खेळाडू आपल्या घरी रवाना झाले. भारताचा कर्णधार विरारकर आयुष म्हात्रे आपल्या घरी पोहचला. त्यानंतर अवघ्या काही वेळात आयुषची जंगी मिरवणूक काढण्यात आली.

आयुषने वर्ल्ड कप जिंकून देत भारताचं नावं उंचावलं. तसेच आयुषमुळेच विरारचं नाव जागतिक पातळीवर पोहचलं. या वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला पाहण्यासाठी वसई-विरारकरांनी एकच गर्दी केली. आयुषची एका चारचाकी गाडीतून ही विजयी मिरवणूक काढण्यात आली.

आयुषने नालासोपारा पूर्वमध्ये असलेल्या गणेश पार्क या मैदानातून क्रिकेटची सुरुवात केली. त्याच मैदानातून आयुषच्या विजयी मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीत आयुषच्या नातेवाईकांसह वसई-विरारकर सहभागी झाले. आपल्या गावातल्या पोराने जगात नाव कमावल्याचा आनंद गावकऱ्यांचा चेहऱ्यावर या मिरवणुकीदरम्यान पाहायला मिळाला. तसेच चाहत्यांकडून मिरवणुकीत आयुष म्हात्रेचा जयघोष करण्यात आला.

ये आयुष दादा, छोट्या चाहत्यांची उपस्थिती

आयुषचं या विजयी मिरवणुकीचं ठिकठिकाणी स्थानिकांकडून स्वागत करण्यात आलं. आयुषचा हारतुऱ्यांनी सत्कार करण्यात आला. आयुषला पाहण्यासाठी त्याच्या छोट्या चाहत्यांनीही एकच गर्दी केली होती. “ये आयुष दादा”, अशी एका छोट्या चाहत्याने कॅप्टनला हाक मारली. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

आयुषची अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी

दरम्यान आयुषने या अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत नेतृत्वासह बॅटिंग आणि बॉलिंगनेही योगदान दिलं. आयुषने 7 सामन्यांमधील 7 डावांत 30.57 च्या सरासरीने आणि 113.23 च्या स्ट्राईक रेटने एकूण 214 धावा केल्या.  आयुष म्हात्रे याने या 7 डावांदरम्यान एकूण  14 षटकार आणि 20 चौकार लगावले.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना