आयुष म्हात्रे
मुंबईकर आयुष म्हात्रे भारतीय अंडर-19 संघाचे नेतृत्व करत आहे. अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी संघाची धुरा त्याच्या खांद्यावर आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये आयुष म्हात्रेने 181 धावांची खेळी खेळून लिस्ट एमध्ये 150 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या सर्वात तरुण खेळाडू म्हणून जागतिक विक्रम केला होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 49 चेंडूत शतक ठोकत तिन्ही स्वरूपात शतक करणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला. आयपीएलमध्ये 17 वर्षांचा असताना चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो.
Under-19 World Cup 2026: अंडर 19 वर्ल्डकप जिंकल्यावर का पैसा मिळत नाही? जाणून घ्या
ICC Under-19 World Cup: अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही तासाने सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. चला जाणून घेऊयात या स्पर्धेबाबत...
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 14, 2026
- 8:49 pm