AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup Final 2026 : भारताचा इंग्लंड विरुद्ध अंतिम सामन्यात बॅटिंगचा निर्णय, आयुष-वैभववर मोठी जबाबदारी

U19 World Cup 2026 Final India vs England Toss Result and Playing 11 : इंग्लंड आणि टीम इंडिया दोन्ही संघ वर्ल्ड कप ट्रॉफीपासून एक पाऊल दूर आहेत. या अशा निर्णायक सामन्यात भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. जाणून घ्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण कोण आहे?

U19 World Cup Final 2026 : भारताचा इंग्लंड विरुद्ध अंतिम सामन्यात बॅटिंगचा निर्णय, आयुष-वैभववर मोठी जबाबदारी
Ayush Mhatre IND vs ENG U19 World Cup Final 2026Image Credit source: Social Media
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 06, 2026 | 2:27 PM
Share

आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम आणि निर्णायक अशा सामन्याच्या थराराला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना हरारे स्पोट्स क्लबमध्ये खेळवण्यात येणार आहे. या महाअंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने आहेत. भारताने अंतिम फेरीत सलग सहाव्यांदा तर एकूण दहाव्यांदा धडक दिलीय. टीम इंडिया समोर आता फायनलमध्ये इंग्लंडचं आव्हान आहे. भारताने या अतिशय महत्त्वाच्या अशा सामन्यात टॉस जिंकला आहे. कर्णधार आयुष म्हात्रे याने नाणेफेक जिंकताच फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अशात आता टीम इंडियाची ही युवा ब्रिगेड इंग्लंडसमोर किती धावांचं आव्हान ठेवण्यात यशस्वी होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग ईलेव्हन अनचेंज

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दन्ही संघ उपांत्य फेरीतील त्याच 11 खेळाडूंसह मैदानात उतरले आहेत.

आयुष-वैभववर मोठी जबाबदारी

या महाअंतिम सामन्यात कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या स्टार जोडीवर मोठी जबाबदारी असणार आहे. या दोघांकडून चाहत्यांना अंतिम सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. वैभव आणि आयुष या दोघांमध्ये मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. दोघांनी वेळोवेळी मोठी खेळी केली आहे. मात्र अंतिम सामन्यात हे दोघे कशी कामगिरी करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वैभवची आकडेवारी

दरम्यान वैभव या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. वैभवने 6 सामन्यांत 44 च्या सरासरीने आणि 147.49 च्या स्ट्राईक रेटने एकूण 264 धावा केल्या आहेत. वैभवने या दरम्यान 26 चौकार आणि 15 षटकार लगावले आहेत.

अंडर 19 टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : ॲरॉन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल आणि दीपेश देवेंद्रन.

अंडर 19 इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मेस, थॉमस रेव (कर्णधार), कॅलेब फाल्कनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लम्सडेन आणि ॲलेक्स ग्रीन.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...