AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : ॲरॉन जॉर्जचं कडक शतक, टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, अफगाणिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा

India U19 vs Afghanistan U19, 2nd Semi Final Match Result : अंडर 19 टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानवर एकतर्फी फरकाने मात करत फायनलमध्ये रुबाबदार एन्ट्री केली आहे.

IND vs AFG : ॲरॉन जॉर्जचं कडक शतक, टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, अफगाणिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा
India vs Afghanistan U19 World Cup Semi Final 2 Match ResultImage Credit source: BCCI X
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 04, 2026 | 10:18 PM
Share

टीम इंडियाने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर 7 विकेट्स मात केली आहे. अफगाणिस्तानने टीम इंडियासमोर 311 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 53 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 41.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. भारताची ही अंतिम फेरीत पोहचण्याची सलग सहावी आणि एकूण दहावी वेळ ठरली.  ॲरॉन जॉर्ज हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ॲरॉनने शतक झळकावलं. तर कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या स्टार जोडीने अर्धशतक झळकावत भारताच्या विजयाचा पाया रचला. तसेच इतर फलंदाजांनीही योगदान दिलं. आता वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी टीम इंडिया अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे.

सामन्याचा धावता आढावा

अफगाणिस्तानने टॉस जिंकला. अऱफगाणिस्तानच्या कॅप्टनने बॅटिंगचा निर्णय घेतला.  अफगाणिस्तानसाठी उझैरुल्ला नियाझाई आणि फैसल शिनोजादा या जोडीने शतक झळकावलं. त्यामुळे अफगाणिस्तानला 300 पार पोहचता आलं. अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 310 धावा केल्या. फैसलने 93 बॉलमध्ये 110 रन्स केल्या. तर उझैरुल्ला याने नाबाद 101 धावांचं योगदान दिलं. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 208 धावांची विक्रमी भागीदारी केली. तर इतरांनीही योगदान दिलं.

भारताची चाबूक सुरुवात

भारताची विजयी धावांचा पाठलाग करताना कडक सुरुवात झाली. ॲरॉन जॉर्ज आणि स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी या जोडीने 90 धावांची भागीदारी केली. वैभवने 33 चेंडूत 68 धावा केल्या. त्यानंतर कॅप्टन आयुष म्हात्रे याने 59 बॉलमध्ये 62 रन्स केल्या. त्यानंतर आयुष आऊट झाला.

ॲरॉन जॉर्जचं कडक शतक

ॲरॉन जॉर्ज भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ॲरॉनने केलेल्या या खेळीमुळे भारताला अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील बाद फेरीत सर्वोच्च धावसंख्येचा सहज यशस्वी पाठलाग करता आला. ॲरॉनने 104 बॉलमध्ये 115 धावा केल्या. ॲरॉनेन या खेळीत 15 चौकार आणि 2 षटकार लगावले.

अंतिम फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड

दरम्यान आता वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. इंग्लंडने मंगळवारी 3 फेब्रुवारीला गतविजेता ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.  उभयसंघातील महाअंतिम सामन्याचा थरार हा शुक्रवारी 6 फेब्रुवारीला रंगणार आहे. आता या महाअंतिम सामन्यात कोण जिंकणार? याची चाहत्यांना उत्सूकता आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...