टेरेसवर झोपाळ्यावर खेळत होता मुलगा, अचानक जे घडले ते पाहून कुटुंबीय हादरले !

तेथेच खेळत असलेल्या मुलाच्या बहिणीने हे पाहिल्यानंतर तिने कुटुंबीयांना याची माहिती घरच्यांना दिली. घरच्यांनी तात्काळ छताकडे धाव घेत मुलाला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

टेरेसवर झोपाळ्यावर खेळत होता मुलगा, अचानक जे घडले ते पाहून कुटुंबीय हादरले !
झोका खेळताना गळ्यात दोरी अडकल्याने मुलाचा मृत्यू
Image Credit source: google
| Updated on: Feb 13, 2023 | 3:22 PM

अंबाला : घराच्या छतावर झोपाळ्यावर खेळत असताना झोपाळ्याची दोरी गळ्यात अडकल्याने श्वास गुदमरुन एका 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना हरियाणातील अंबाला येथे घडली. अंबालातील न्यू इंद्रपुरी कॉलनीत ही घटना घडली आहे. मुलाला तात्काळ कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. बहिणीने सदर घटना पाहिल्यानंतर तिने कुटुंबीयांना याची माहिती दिली. यानंतर कुटुंबीयांनी धाव घेतली. मात्र मुलाचा गुदमरुन मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घराच्या छतावर झोका खेळत होता मुलगा

अंबाला शहरातील न्यू इंद्रपुरी कॉलनीतील एका घराच्या छतावर आठ वर्षाचा मुलगा झोका खेळत होता. यावेळ त्याची बहिणही तिथेच खेळत होती. झोका घेत असतानाच झोक्याची दोरी मुलाच्या गळ्याभोवती अडकली.

गळ्याभोवती दोरी अडकल्याने श्वास गुदमरुन मृत्यू

तेथेच खेळत असलेल्या मुलाच्या बहिणीने हे पाहिल्यानंतर तिने कुटुंबीयांना याची माहिती घरच्यांना दिली. घरच्यांनी तात्काळ छताकडे धाव घेत मुलाला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गळ्याभोवती दोरी अडकल्याने श्वास गुदमरुन मुलाचा मृत्यू झाला.

स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवला.