Bhandara : प्रात्यक्षिकावेळी तहसिलदार आणि दारु पिलेल्या तिघांमध्ये वाद, संतापलेल्या तहसिलदारांनी पोलिसांना…

| Updated on: Jan 14, 2023 | 9:48 AM

दारु पिलेल्या तिघांची तहसीलदारांना शिवीगाळ, बोटीत बसण्यावरुन झाला वाद झाला. पोलिसांनी तिघांना रात्री घरातून अटक केली आहे.

Bhandara : प्रात्यक्षिकावेळी तहसिलदार आणि दारु पिलेल्या तिघांमध्ये वाद, संतापलेल्या तहसिलदारांनी पोलिसांना...
bhandara pipalgaon
Image Credit source: tv9marathi
Follow us on

पिंपळगाव : राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) प्रात्यक्षिकासाठी तलावावर गेलेल्या लाखंडूरच्या तहसीलदारांना (Tehsildar) तीन दारु पिलेल्या व्यक्तींनी शिवीगाळ केली असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर तालुक्यातील पिंपळगाव (Bhandara pimpalgaon) गावात घडली आहे. या प्रकरणाची तक्रार तहसीलदार वैभव पवार पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. टिकाराम मडावी, उमराव लंजे आणि शालीक धोटे अशी तिघांची नावे आहेत.

नेमकं काय झालं

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे लाखांदूर येथे प्रशिक्षण आयोजित केले होते. सकाळी 12 ते 2 वाजेपर्यंत तहसील कार्यालयात प्रशिक्षण दिले. त्यानंतर दुपारी 3 वाजता पिंपळगाव येथील तलावावर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रात्यक्षिक सुरू असताना तीन मद्यधुंद व्यक्ती तिथं आल्या. त्यांनी आम्हाला बोटीमध्ये बसू द्यावं असं सांगितलं. परंतु तहसीलदार पवार यांनी ते मद्य प्राशन करून असल्याने बोटीत बसण्यास नकार दिला.

हे सुद्धा वाचा

त्यावेळी या तिघांनी तहसीलदार वैभव पवार यांना अश्लील शिवीगाळ सुरू केली. या प्रकाराची माहिती तहसीलदार पवार यांनी तत्काळ लाखांदूर पोलिस ठाण्याला मोबाईलवरुन कळवली. पोलिसांनी थेट पिंपळगाव गाठले, तेव्हा तिघेही तेथून पळून गेले होते. रात्री 10 वाजता स्वत: तहसीलदार पवार यांनी ठाण्यात येऊन या प्रकरणाची तक्रार नोंदविली. शिवीगाळ करणाऱ्या त्या तिघांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध 294, 186, 506, 34 कलमांन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समजली आहे.