भारतातील बेरोजगारांना नोकरीचं आमिष देत रशिया-युक्रेन युद्धाला पाठवलं, नेटवर्कचा मुख्य सूत्रधार फैजलचा पर्दाफाश

| Updated on: Mar 08, 2024 | 9:34 PM

परदेशात नोकरीचं आमिष देत रशिया-युक्रेन युद्धासाठी पाठवत भारतीय तरूणांची फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे वसईमधून थेट दुबईपर्यंत असल्याचं समोर आलं आहे.

भारतातील बेरोजगारांना नोकरीचं आमिष देत रशिया-युक्रेन युद्धाला पाठवलं, नेटवर्कचा मुख्य सूत्रधार फैजलचा पर्दाफाश
Follow us on

मुंबई : परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने भारतीय तरुणांना रशिया युक्रेन युद्धक्षेत्रात पाठविणाऱ्या मल्टी-स्टेट नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे सीबीआयने याबाबत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. या नेटवर्कचे धागेदोर वसईत पोहचले असून याचा मुख्य सूत्रधार फैजल उर्फ बाबा हा वसईतील असून तो सध्या दुबईत राहत आहे.

सीबीआय च्या एका टीम ने वसईत येवून फैजल यांच्या टीम मधील सोफियान आणि त्याची पत्नी पूजा यांच्या घरी दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत तपास करून गेली आहे. फैजल हा बाबा vlogs नावाच्या युट्यूब चॅनल वरून परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन भारतीय तरुणांना देत होता. सोफियान आणि पूजा हे पती पत्नी भारतीय तरुणाचे कागदपत्र घेवून ते फैजलला पाठवत असल्याचे सध्या समोर आले आहे. फैजल उर्फ बाबा हा वसई च्या सुरूची बाग परिसरातील वेंच्युरा रेशिदेंशी काँपलक्स मध्ये राहत होता तर सोफियांन आणि पूजा ह्या त्याच्या समोरील साई आशीर्वाद या इमारतीत राहत आहेत.

सीबीआयकडून मुंबईसह एकूण सात शहरात छापेमारी टाकण्यात आली आहे. या छापेमारीत 50 लाख रोख रक्कम संशयास्पद कागदपत्र आणि तांत्रिक पुरावे आढळले आहे. आत्तापर्यंत 35 जणांची मानवी तस्करी झाल्याचं तपासात समोर आलं आहे. सीबीआयने काही जणांना ताब्यात घेतलं आहे. सीबीआयकडून जवळपास 10 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. सीबीआयने अनेक व्हिजा कन्सल्टन्सी आणि एजंट विरोधात गुन्हा दाखल केला आहे.