Video : धाड धाड धाड…टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, हादरवून टाकणारा पहिला व्हिडीओ समोर!
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्याकारवर जुहूत गोळीबार झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जुहू्च्या पुष्पापार्क येथे फुटबॉल मॅच खेळून टायगर श्रॉफ जात होता. त्यावेळी लोक त्याची छबी टिपण्याचा प्रयत्न करत असताना टायगर श्रॉफच्या कारवर मोटार सायकलवरुन आलेल्या तिघा अज्ञातांनी हा गोळीबार केल्याचे म्हटले जात आहे.
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्याकारवर जुहूत गोळीबार झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जुहू्च्या पुष्पापार्क येथे फुटबॉल मॅच खेळून टायगर श्रॉफ जात होता. त्यावेळी लोक त्याची छबी टिपण्याचा प्रयत्न करत असताना टायगर श्रॉफच्या कारवर मोटार सायकलवरुन आलेल्या तिघा अज्ञातांनी हा गोळीबार केला. त्यात टायगर श्रॉफला गोळी लागलेली नसल्याचे समजते. त्यात अन्य दोन जण जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात एका व्यक्तीने काढलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे.
तीन ते चार राऊंड फायर केल्याचा आवाज
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा जुहूतील पुष्पापार्क येथे फुटबॉल मॅच खेळून त्याच्या बीएमडब्ल्यू कारमधून घरी परतत असताना ही घटना घडली आहे. टायगर श्रॉफची कार जात असताना तेथे त्याचे चाहते त्याची छबी टिपत असताना अचानक दुचाकीवरुन आलेल्या तिघा व्यक्तींनी हा गोळीबार केला. गोळीबाराची तीन ते चार राऊंड फायर केल्याचा आवाज या व्हिडीओ ऐकायला येत आहे. या गोळीबारात टायगर श्रॉफचा ड्रायव्हर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर या परिसरात प्रचंड घबराट पसरली. या प्रकरणात आता गुन्हे शाखेने तपास सुरु केला आहे.
टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला
अभिनेता टायगर श्रॉफ फुटबॉल मॅच खेळून त्याच्या कारमधून जात असताना पुष्पा पार्क परिसरात त्याचे चाहते त्याच्या सोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असताना अचानक मोटर सायकलवरुन आलेल्या तिघा जणांनी बीएमडब्ल्यू कारवर गोळीबार केला. यावेळी अभिनेता टायगर श्रॉफ थोडक्यात बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबारात टायगर श्रॉफचा चालक आणि एक रिक्षा चालक जखमी झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यांना जखमी अवस्थेत नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.